शेतकऱ्यांची थकीत रक्कम द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा श्री शंकर सहकारी साखर कारखाना प्रशासनाला इशारा..
खासदार राजू शेट्टी, तानाजीकाका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनवीर अजितभैया बोरकर शेतकरी व सभासद यांच्या थकीत बिलासाठी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात..
सदाशिवनगर ( बारामती झटका )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखाना चेअरमन, व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालक यांना निर्वाणीचा इशारा देऊन पत्र दिलेले आहे. शेतकऱ्यांचे थकीत बिल खात्यावर अदा करा, बळीराजा अडचणीत आहे, बळीराजाला अडचणीतून बाहेर काढण्याकरता त्याला थकीत बिलाची गरज आहे. थकीत बिल दिले तरच नवीन उसाची लागवड किंवा अन्य पीक घेऊ शकतो. शेतकरी कोलमडला आहे, यासाठी आपण त्वरित शेतकऱ्यांचे बिल अदा करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजित (भैय्या) बोरकर, दादासाहेब काळे, समाधान काळे यांच्यासह अनेक शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजित डुबल यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदरच्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट सन २०१५-१६ सालाचे अंदाजे २० कोटी व त्यावरील व्याजाची रक्कम २० कोटी (१९६६ शुगर ॲक्टप्रमाणे १५ टक्के व्याज रुपये अंदाजे एकूण ४० कोटी रुपये व मागील वर्षाची १० कोटी थकीत एफआरपी अशी एकूण शेतकऱ्यांचे अंदाजे ५० कोटी रुपये मिळावेत. श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकार मार्फत ११३ कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मिळालेले आहेत.
त्या संदर्भात कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांची ५० कोटी व्याजासह त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत. ते पैसे जमा न झाल्यास आम्ही सर्व शेतकरी बांधव निषेध करणार आहोत. त्यामुळे कारखाना प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पेमेंट जमा करावे अशी नम्र विनंती देखील या निवेदनात करण्यात आली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती माळशिरस पोलीस स्टेशन आणि तहसीलदार माळशिरस यांना देण्यात आल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
stihl motorlu testere, çim biçme makinası, bahçe el aletleri, motorlu testere yedek parça, aksesuar, tırpan aksesuar, su motoru