श्रीनाथ व श्री हनुमान भंडारा निमित्त फडतरी येथे कुस्त्यांची जंगी दंगल होणार…

श्रीनाथ व श्री हनुमान भंडारा निमित्त सालाबादप्रमाणे फडतरी येथील कुस्त्यांच्या भव्य जंगी मैदानात पन्नास रुपये पासून एक लाख रुपये इनामांच्या कुस्त्या होणार…
फडतरी (बारामती झटका)
श्रीनाथ व श्री हनुमान भंडारा निमित्त रविवार दि. 10/09/2023 रोजी निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदानात कुस्त्यांची दंगल पहावयास मिळणार आहे. मैदानामध्ये पन्नास रुपये पासून एक लाख रुपये इनामाच्या कुस्त्या लावण्यात येत असतात.
सालाबादप्रमाणे निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदानाचे आयोजन केलेले आहे.
दुपारी 11 ते 02 पर्यंत पैलवानांनी उपस्थित राहावे. इनाम रुपये पन्नास रुपयापासून एक लाख रुपयाच्या कुस्त्या या वेळेत नेमल्या जातील. दुपारी 02 नंतर येणाऱ्या पैलवानांचा विचार केला जाणार नाही. मैदानात एकही कुस्ती जोडली जाणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आयत्यावेळी बदल करण्याचा अधिकार पंच कमिटीस राहील. कुस्ती बरोबरीत सुटल्यास इनामाचा चौथा हिस्सा दिला जाईल, याची पैलवानांनी नोंद घ्यावी. सदरच्या कुस्ती मैदानाचे आयोजक समस्त ग्रामस्थ फडतरी यांच्यावतीने करण्यात येत आलेले आहे.
शिंगणापूरच्या पायथ्याला डोंगर कपारीमध्ये वसलेले फडतरी गाव आहे. या गावांमध्ये जागृत व ग्रामदैवत यांच्या भंडार्यानिमित्त निकाली कुस्त्यांचे भव्य जंगी मैदानाचे आयोजन अनेक वर्षापासून आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मैदानात कुस्त्या जोडल्या जातात. कुस्ती नेमून केली जात नाही. कुस्त्याचा फड सुरू असताना मान्यवर अथवा आर्थिक सहकार्य करणाऱ्या लोकांना मैदानात फिरवले जात नाही, हे या मैदानाचे वैशिष्ट्य आहे. सर्व कुस्त्या निकाली होत असतात.
फरतडीच्या कुस्ती मैदानात महाराष्ट्रातील नामांकित मल्ल कुस्ती खेळण्याकरता येत असतात. प्रेक्षकांना बसण्याची खास व्यवस्था असते. कोठेही बसले तरी मैदानामधील कुस्त्या सहज पाहता येतात. नैसर्गिक व भौगोलिक वारसा लाभलेल्या फडतरी गावाला कुस्ती शौकिनांची तोबा गर्दी असते. समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन कुस्तीचे मैदान यशस्वी पार पाडत असतात.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng