श्रीनाथ बोधोबा यात्रा कमिटी लोणंद यांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न होणार…

लोणंद गावचे सरपंच हनुमंतराव रुपनवर उर्फ अण्णा व यात्रा कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य नियोजन केलेले आहे..
लोणंद (बारामती झटका)
लोणंद ता. माळशिरस येथे यांच्या वतीने श्रीनाथ बोधोबा यात्रा कमिटी लोणंद यांच्यावतीने लोणंद गावचे सरपंच हनुमंतराव रुपनवर उर्फ अण्णा व यात्रा कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन रविवार दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे.
या मैदानात रवींद्र पाटील कोल्हापूर यांचा पठ्ठा पैलवान गणेश कुंकुले विरुद्ध कै. दत्ताआप्पा वाघमारे अकलूज यांचा पठ्ठा पैलवान संतोष जगताप यांच्यात लढत होणार आहे. स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा पैलवान संग्राम साळुंखे विरुद्ध अस्लम काझी कुर्डूवाडी यांचा पठ्ठा पैलवान मनोज माने यांच्यात लढत होणार आहे. वस्ताद शंकर काळे नातेपुते यांचा पठ्ठा पैलवान आशिष वावरे विरुद्ध पैलवान श्रीमंत भोसले यांच्यात लढत होणार आहे. वस्ताद काका पवार पुणे यांचा पठ्ठा पैलवान शुभम माने विरुद्ध मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे चा पैलवान दिग्विजय जाधव यांच्यात लढत होणार आहे. पंकज हरगुडे पुणे यांचा पठ्ठा पैलवान श्रेयस लवटे विरुद्ध अस्लम काझी कुर्डूवाडी यांचा पठ्ठा पैलवान मोईन पटेल यांच्यात लढत होणार आहे.

वस्ताद शंकर काळे नातेपुते यांचा पत्ता पैलवान धुळदेव पांढरे विरुद्ध पैलवान शुभम मांडवे यांच्यात लढत होणार आहे. शंकर काळे नातेपुते यांचा पठ्ठा पैलवान निलेश खताळ विरुद्ध पैलवान दादा हरी यांच्यात लढत होणार आहे. वस्ताद शंकर काळे यांचा पठ्ठा पैलवान रणजीत पवार विरुद्ध पैलवान अक्षय नानेकर यांच्यात लढत होणार आहे. पैलवान रोहन लोंढे विरुद्ध पैलवान मंगेश बेले यांच्यात लढत होणार आहे. वस्ताद शंकर काळे नातेपुते यांचा पठ्ठा पैलवान रोहित चव्हाण विरुद्ध मामासाहेब मोहोळ पुणे यांचा पठ्ठा पैलवान प्रताप माने यांच्यात लढत होणार आहे. पैलवान गौरव रुपनवर विरुद्ध पैलवान संग्राम वाघमोडे यांच्यात लढत होणार आहे. पैलवान गणेश रुपनवर विरुद्ध पैलवान रवी रुपनवर यांच्यात लढत होणार आहे. पैलवान अविनाश दांडेकर विरुद्ध पैलवान करण मासाळ यांच्यात लढत होणार आहे.
तसेच यावेळी पैलवान शिवप्रसाद सोनवणे, पैलवान श्रीमंत लोंढे, पैलवान बबलू चव्हाण, पैलवान समाधान मोहिते, पैलवान आर्यन रुपनवर, पैलवान विराज रुपनवर, पैलवान प्रज्योत निरव यांच्या देखील कुस्त्या लावण्यात येणार आहेत. या कुस्ती मैदानाचे समालोचन हनुमंत शेंडगे सर हे करणार आहेत. तरी जास्तीत जास्त मल्ल सम्राट, वस्ताद, पैलवान, कुस्तीशौकीन व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng