शिवराज व युवराज जलसंधारण विभागाचे “आका” तर “आका” चे “आका” ने कामाची वाट लावली..

माळशिरस तालुक्यातील जलसंधारण कामाची बातमी प्रसारित केल्यानंतर तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण…
माळशिरस (बारामती झटका)
केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांनी शेतकऱ्यांची पाण्याची अडचण असल्याने जलसंधारण विभागामार्फत माळशिरस तालुक्यात जलसंधारणाची ओढा खोलीकरण, सरळीकरण, नालाबांध, सिमेंट बंधारे, अशी कामे मंजूर करून कोट्यावधी रुपये शासनाने खर्च केलेले आहेत. सदरची कामे अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे न होता निकृष्ट दर्जाची करून फक्त घोडीला घोडा लावण्याचे काम माळशिरस तालुक्यात जलसंधारण कामांमध्ये शिवराज व युवराज जोडगोळीने जलसंधारण कामाची वाट लावली आहे. पाण्यापेक्षा जास्त पैसाच मुरला असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. अशी बातमी प्रसारित केल्यानंतर शिवराज व युवराज जलसंधारण विभागाचे “आका” आहेत तर जोडगोळीतील दोन्ही “आकां”ना कामांमध्ये प्रोत्साहन देणारा एक “आका” आहे. आकाने कामांची वाट लावली, अशी माळशिरस तालुक्यात जलसंधारण कामाची बातमी प्रसारित केल्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.
सदरच्या प्रसारित केलेल्या बातमीमध्ये प्रस्थापित नेते व युवा नेते यांच्या नावाचा वापर करून शिवराज व युवराज जोडगोळीने तालुक्यातील जलसंधारण विभागाची अनेक कामे निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. तरीसुद्धा, राजकीय दबावापोटी सदरच्या कामांचे मोजमाप करून बीले उचललेली आहेत. कितीतरी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना गावामध्ये काम मंजूर आहे आणि काम पूर्ण झाले, याची कितीतरी वेळा कल्पना सुद्धा नाही. ग्रामपंचायतीमधील कोणालातरी हाताला धरून युवराज व शिवराज यांनी जलसंधारण विभागांमध्ये नंगानाच केलेला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पाण्याची चणचण भासत आहे. शासनाने जलसंधारणाची कामे करून पाण्याचे स्तोत्र वाढविण्याचा हेतू बाजूला राहिला युवराज व शिवराज यांच्या निकृष्ट कामामुळे पाण्याऐवजी जास्त पैसाच मुरला आहे. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून केलेल्या कामांची चौकशी व्हावी, शेतकऱ्यांच्या या मागणीने जोर धरलेला आहे. शिवराज व युवराज यांनी कोणती मजूर संस्था वापरली, ग्रामपंचायतीमधून कोणाच्या खात्यावर रक्कम कशा पद्धतीने आली, याचीही खातेनिहाय चौकशी करावी, अशी ग्रामपंचायतीमधील सुज्ञ सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्यामधूनही बोलले जात आहे.
बातमी प्रसारित झाल्यानंतर सदरच्या प्रकरणाला तोंड फुटले आहे. अनेकांनी समक्ष भेटून गावातील जलसंधारणाच्या ओढा खोलीकरण, सरळीकरण, नालाबांध, सिमेंट, बंधारे, तयार करीत असताना “आका” चे नाव सांगत होते. अनेक गावातील लोकांनी “आका” शी संपर्क केलेला होता तरीसुद्धा “आका” ने दुर्लक्ष केलेले होते. कारण दबक्या आवाजात “आका”चीच कामे असल्याची कुणकुण ऐकायला मिळत होती. शिवराज व युवराज जोडगोळी असणारे जलसंधारणातील “आका” यांची कामे आहेत का ? दोन्ही “आका” ना पाठीशी घालून अधिकाऱ्यांवर दबाव आणून मोजमाप करून बिले काढणारे “आका” यांची कामे आहेत’ याची खात्री करण्याचे काम तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिक यांचे गोपनीयरित्या सुरू आहे. लवकरच “आका”चे “आका” कोण ? याचा उलगडा होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.