शिवरत्नची मलिदा गँग माळशिरस तालुक्यात पुन्हा सक्रिय – युवा नेते सुमित भोसले
श्रीपुर (बारामती झटका)
रा. मा. 145 ते महाळुंग श्रीपूर सेक्शन 15 ते नेवरे या प्रजिमा क्रमांक 118. अंदाजे 5 कि.मी. रस्त्याचे सुधारणा करण्याचे 4 कोटीचे काम 2022-23 च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये 5054 मार्ग व पूल 04 मधून माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले होते.
सदर काम सुरू असताना कामाची गुणवत्ता ही ढासळलेली दिसून येत आहे. सदर काम अमित कन्स्ट्रक्शन यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून तिथल्या समाजसेवकांना दमदाटी केली जात आहे. यामध्ये उप अभियंता संयम कास्ते साहेब यांना फोन करून बोलावले असता हे निकृष्ट दर्जाचे काम चालू होते सांगितले असता हे काम निकृष्ट दर्जाचे आहे, ते तुम्ही थांबवा. त्यावेळेस ते म्हणाले की, इंजिनीयर मी आहे का तुम्ही ?, त्यामुळे ह्या भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टदारांना हे देखील सामील आहेत असा प्रश्न पडतो.
सुमित भोसले यांनी या कामाविषयी विचारले असता कन्स्ट्रक्शनचे मालक महेश अजय भोसले व विजय भोसले यांच्याकडून दमदाटीची भाषा केली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.