बार्शी येथे मोफत फिजीओथेरपी आरोग्य शिबीर

बार्शी (बारामती झटका)
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त मोफत राज्यस्तरीय फिजोओथेरपी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. फिजोओथेरपी आरोग्य शिबीर सोलापूर जिल्ह्यात प्रथमच होत आहे.
या शिबिरामध्ये ऑपरेशननंतरचे व्यायामोपचार, हातापायाला मुंग्या येणे, शीयटिका, स्पॉन्डिलेसिस, अर्धांगवायू, चेहऱ्याचा अर्धांगवायु. सेरेबल पाल्सी, पार्कींगसन्स, पोलीओ, नस्कुलर डिस्ट्रॉफी, जी. बी. एस. सी., टी. इ. व्ही., टी. एच. आर. टी. के., आर.ए.सी.एल., पी.सी.एल., आरइएचएबी इत्यादी मानेचे आजार, मणक्याचे आजार, त्यांना ट्रॅक्शन, मसल स्टीम्युलेटर, पराफीन वॅक्स अशा विविध उपचार पध्दतीने तपासणी करण्यात येणार आहे. याच बरोबर मान दुखी, खांदा दुखी, कोपरा दुखी, रिस्ट ड्रॉप, फुट ड्रॉप, पाठ दुखी, मणक्याचे आजार, कंबर दुखणे, गुडघे दुखणे, संधीवात, स्नायुंचे दुखणे, प्लास्टर काढल्यानंतरचे व्यायाम, खेळाडूंच्या दुखापती, सांध्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुर्नवसव, प्लास्टीक सर्जरी यावरील उपचाराची माहिती देण्यात येणार आहेत.
हे शिबीर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दि. २५ जानेवारी व दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत होणार आहे. या शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टर्स डॉ. दीपा बासुंदे, डॉ. ऋषिकेश पोळ, डॉ. सौरभ झा, डॉ. शेख इर्शाद, डॉ. समृद्धी देशपांडे हे मोफत तपासण्या करणार आहेत. इच्छुकांनी या शिबीराचा जास्तीजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. इर्शाद शेख व डॉ. समृद्धी देशपांडे यांनी केले आहे.
इच्छुकांनी नाव नोंदणी अवश्य करावी किंवा शिबिराच्या ठिकाणी उपस्थित रहावे. सदर शिबीराची नाव नोंदणी व चौकशी दि. १५ जानेवारी २०२५ ते २४ जानेवारी २०२५ या दरम्यान करावी. चौकशी विभाग जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी. नाव नोंदणीसाठी संपर्क – 8262084800 / 9322799183
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.