ताज्या बातम्यासामाजिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मल्हार साखर कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण…

मल्हार साखर कारखाना लिमिटेड हिमालय नगर चांदापुरी येथे चेअरमन श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांनी पर्यावरणाचा समतोल राखला…

माळशिरस (बारामती झटका)

आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मल्हार साखर कारखाना लिमिटेड हिमालय नगर चांदापुरी, ता. माळशिरस येथे चेअरमन श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांनी पर्यावरणाचा समतोल राखत कारखाना स्थळावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

दिवसेंदिवस आधुनिकीकरण व विस्तारीकरणामुळे वृक्षांचा ऱ्हास होत चाललेला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राहत नाही. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे’ या न्यायाप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता व भविष्याची गरज ओळखून कारखाना स्थळावर दूरदृष्टी असणारे चेअरमन श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कारखाना स्थळावर वृक्षारोपण केलेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button