शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे व आमदार शहाजीबापू पाटील यांच्यात चर्चा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द पुरा करण्यासाठी खासदार निंबाळकरांना विजयी करण्याचा निर्णय…
करमाळा (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत शेतकरी संघटना युतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासंदर्भात आज सांगोला येथे आमदार शहाजीबापू पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी सांगोला शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. शहाजीबापू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे अध्यक्ष अमित शहा व कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना महाराष्ट्रातून ४५ खासदार निवडून देण्याचे वचन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्यक्ष शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली दरबारी मान उंच करायची असेल तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाख मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली असून तसा मी शब्द सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिला आहे. यासाठी सर्व शिवसैनिकांनी काम करावे. करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे या सर्व भागात शिवसेनेची स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे.
यावेळी महेश चिवटे बोलताना म्हणाले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघ शिवसेनेकडे असून हे सर्व मतदार संघ जिंकून आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे व येणाऱ्या काळात लवकरच आ. शहाजीबापू पाटील यांना मंत्रीपद व जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी आ. शहाजीबापू पाटील यांना मंत्रिपद मिळणे काळाची गरज असून त्यासाठी आधी सोलापूर व माढा दोन्ही लोकसभा मतदारसंघातून दोन्ही भाजपचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिक कामाला लागल्याचे सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Bwer Pipes: Leading the Way in Agricultural Irrigation Technology: Revolutionize your irrigation practices with Bwer Pipes’ innovative solutions. Our cutting-edge sprinkler systems and durable pipes are engineered to withstand the harsh conditions of Iraqi agriculture, ensuring optimal water usage and crop growth. Learn More
I thoroughly enjoyed this piece. It was both informative and engaging, providing a lot of valuable information. Let’s discuss further. Check out my profile for more interesting content.