शिवसेनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वस्ताद सचिन माने यांच्या बेमुदत आमरण उपोषणाचा चौथा दिवस
महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मलीन करणार्या भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात कारवाई होण्यासाठी वस्ताद सचिन माने यांचे बेमुदत आमरण उपोषण
बारामती (बारामती झटका)
शिवसेनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वस्ताद सचिन उर्फ पप्पू माने यांनी महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मलीन करणाऱ्या भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी बारामती प्रांत कार्यालयासमोर दि. २६/०१/२०२४ रोजी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
सदर उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. त्यांनी दिलेला पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, उपरोक्त संदर्भिय विषयांस अनुसरून तक्रारी अर्ज करतो की, बारामती औद्योगीक क्षेत्रामध्ये मयुरेश्वर असोसिएटस् यांना कोणतीही निविदा न काढता कदम ब्रदर्स यांचा C 1 हा भुखंड वाचविण्याकरीता भ्रष्टाचार करून दर्शनी भागातील भुखंड क्र. X-13 हा कवडीमोल भावाने देण्यात आला. यामध्ये तत्कालीन मंत्री ते संबंधित व मराऔविम (MIDC) चे अधिकारी दोषी आहेत. याचेच फलित म्हणून एका पुण्यातील MIDC चे अधिकाऱ्याने संबंधीत भुखंडामध्ये होणाऱ्या मॉलमध्ये स्वतःच्या वडिलांच्या नावावर भागीदारी मिळवलेली आहे. शासनाचे नुकसान करून स्वतःची घरे भरणाऱ्या भ्रष्ट प्रशासनावर तात्काळ कडक कारवाई व्हावी व प्रस्तुत प्रकरणी नियम धाब्यावर बसवुन प्रदान करण्यात आलेले दोन्ही भुखंड (C-1 वX-13) हे तात्काळ स्थगीती देऊन ताब्यात घेण्यात यावेत.
बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे खाजगी दलालांच्या माध्यमातुन अतिरिक्त भार असलेल्या गाड्या चालविण्यासाठी विशिष्ट रकमांची वसुली करतात. तर लाईसन्स देण्याकरीता शासकीय फि व्यतिरिक्त जादाची रक्कम आकारतात. अशा सर्व कर्मकांडाच्या माध्यमातुन करोडो रूपयांची मोहमाया संबंधित आरटीओ हे गोळा करतात व या सर्व कार्यात मदतनिस म्हणून काम करणारे काही कर्मचारी जनतेशी अरेरावीची भाषा करतात. तर आरटीओ यांस तक्रार केल्यानंतर आरटीओ हे त्यांचे समर्थन तथा पाठराखन करतात. म्हणून त्यांच्यावर तात्काळ चौकशी करून निलंबन करावे व तुर्तास संबंधित आरटीओ राजेंद्र केसकर यांची बदली व्हावी.
बारामती शहर व तालुका हद्दीमध्ये तीन टप्यामध्ये झालेले इंफ्रा अंतर्गतचे काम हे अतिशिय निकृष्ट दर्जाचे झाले असून, यामध्ये वापरण्यात आलेले साहीत्य अतिशय निकृष्ट दर्जाचे व बहुतांशी प्रमाणात जुने वापरले आहे. व कामामध्ये निघालेले भंगार याची कोणतीही माहीती बारामती नगरपरिषद किंवा म.रा.वि.वि.क. मर्या बारामती यांचेकडे ही नाही. म्हणजेच साहीत्य (भंगार) चोरी गेले आहे या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन इंफ्रा व म.रा. वि.वि.क. मर्या. बारामती यांचेवर कारवाई व्हावी.
तसेच बारामती, दौड, इंदापूर, पुरंदर या भागात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, ऑनलाईन मटका, सावकारी, ऑनलाईन जुगार, अवैध दारू, ताडी, अमली पदार्थ (टरमिन, ड्रग्स, स्टेरॉईन, गांजा) इ. अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत व यावर प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तरी तात्काळ सदर अवैध धंदे बंद व्हावेत. म्हणून आम्ही या भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात शासनाची मलीन होणारी प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी व जनतेसमोर हे दाखविण्यासाठी की, मा. मुख्यमंत्री सो., महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री, मा. उर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांची नावे घेऊन व यांचा या सर्व पापकृत्याला आशिर्वाद आहे, असे भासवुन जनतेच्या मनात संबंधित प्रशासन भितीयुक्त वातावर निर्माण करीत आहे व यामुळे आमच्या भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई (A) महायुतीची बदनामी हे प्रशासन स्वतःचे आर्थिक हीत साधण्यापायी करीत आहे.
तरी सदर प्रकरणी कारवाई होणेकामी आम्ही प्रजासत्ताक दिनाचे औचित्य चित्त साधुन दि. 26/01/2024 पासुन बारामती येथील प्रांत कार्यालयसमोर महायुतीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषणास बसलो आहे. जरी प्राणाची आहुती गेली तरी कारवाई झाल्याशिवाय मागे हटणार नाही, याची नोंद घ्यावी.
निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, मुख्य अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. बारामती परिमंडळ बारामती, प्रांताधिकारी साहेब बारामती, तहसीलदार साहेब बारामती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांना देण्यात आलेल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I was recommended this website by my cousin I am not sure whether this post is written by him as nobody else know such detailed about my difficulty You are wonderful Thanks
Thanks I have just been looking for information about this subject for a long time and yours is the best Ive discovered till now However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply