श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी भिमराव बाबर तर व्हा. चेअरमन पदी सौ. सुनिता जाधव यांची निवड

श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर ता. माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सेवकांची पतसंस्था मर्यादित, श्रीपूर या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यात पतसंस्थेच्या चेअरमनपदी भिमराव शंकर बाबर यांची व व्हा. चेअरमन पदी सौ. सुनिता सर्जेराव जाधव यांची सर्वानुमते निवड झाली.
तर संचालक मंडळ पुढीलप्रमाणे आहेत –
श्री. शिंदे सिध्दनाथ रंगनाथ
श्री. जाधव हरि किसन
श्री. आवताडे बाळासाहेब औदुंबर
श्री. कानगुडे ब्रम्हदेव महादेव
श्री. पाटील अण्णासाहेब उध्दव
श्री. नागणे सिध्देश्वर संभाजी
श्री. पवार अरुण नारायण
श्री. वाघमारे सिताराम विठ्ठल
श्री. भुसनर हणमंत हरि
श्री. खाडे भिकाजी ज्ञानेश्वर
यांची सर्वानुमते संचालक मंडळ कार्यकारिणीत निवड झाली. सचिव म्हणून भारत जाधव यांची निवड करण्यात आली. चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे तसेच कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

नुतन चेअरमन भिमराव बाबर हे मनमिळाऊ व सर्वांचे आवडते व्यक्तीमत्व असून विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. या नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ यांचे विशेष अभिनंदन श्रीपूर मराठी पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.