ताज्या बातम्याराजकारण

पवार साहेब आणि संजय पाटील घाटणेकर यांच्या भेटीने माढा विधानसभेच्या इच्छुकांच्या भुवया उंचावल्या..

माढा (बारामती झटका)

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार आणि बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील घाटणेकर यांच्या राजकीय भेटीने माढा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघाचे षटकार पाणीदार आमदार बबनदादा शिंदे विद्यमान आमदार आहेत. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत आमदार बबनदादा किंवा सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान चेअरमन व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजीतभैय्या शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, माढा लोकसभेच्या निवडणुकीनंतर माढा विधानसभेत महाविकास आघाडीला मताधिक्य वाढलेले असल्याने महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये वाढ झालेली आहे. माढा विधानसभेसाठी संजय पाटील घाटणेकर, संजयबाबा कोकाटे, सौ. मिनल साठे, शिवाजीराव कांबळे, शिवतेजसिंह मोहिते पाटील अशी महाविकास आघाडीकडून नावांची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचे शिवाजीराव सावंत हे सुद्धा इच्छुक आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर यांना शरदचंद्रजी पवार साहेब यांनी लोकसभेच्या वेळेला शब्द दिलेला होता, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू असतानाच पवार साहेब आणि संजय पाटील घाटणेकर दोघांचीच भेट झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्यामुळे माढा विधानसभेत इच्छुक असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.

शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकर यांच्याशी संपर्क झालेला नाही. लवकरच महाविकास आघाडी व महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बारामती झटका यूट्यूब चॅनल वर घेतल्यानंतर भूमिका स्पष्ट होणार आहेत. सध्या तरी संजय पाटील घाटणेकर यांचे भेटीमुळे राजकीय पारडे जड वाटत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button