कृषिवार्ताताज्या बातम्या

श्री. विजय पांढरे यांची कृषी उपसंचालक (मकृसे वर्ग 1) पुणे पदावर बढती; पांढरे घराण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

बोरगाव (बारामती झटका)

महाराष्ट्र शासन कृषी विभाग मंत्रालय मुंबई यांनी नुकत्याच दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार वेळापूर येथील श्री. विजय सावळा पांढरे यांना कृषी उपसंचालक (मकृसे वर्ग 1, कृषी आयुक्तालय,) पुणे या पदावर बढती देण्यात आली आहे. या शासन आदेशानुसार कृषी विभागातील 47 तालुका कृषी अधिकारी/तंत्र अधिकाऱ्यांना वर्ग 1 पदावर पदोन्नती दिल्या आहेत.

शासकीय अधिकाऱ्यांचं गाव म्हणून माळशिरस तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या बोरगाव (माळेवाडी) या गावात त्यांचा जन्म झाला.श या वरिष्ठ पदावरील पदोन्नतीमुळे बोरगाव (माळेवाडी) येथील प्रशासकीय सेवेचा दैदिप्यमान वारसा असणाऱ्या पांढरे घराण्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा लागला आहे. कमी शेती क्षेत्र, बिकट आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाच्या साधनांची अशाश्वतता यावर मात करत पांढरे घराण्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी चांगल्या खाजगी नोकऱ्या, शासकीय सेवेतील महसूल, ग्रामविकास, पोलीस प्रशासन, कृषी विभाग, विक्रीकर विभाग अशा सर्वच क्षेत्रात नाव कमावले आहे. श्री. विश्वास पांढरे न(भापोसे), कल्याण पांढरे (उपजिल्हाधिकारी), कै. दीपक म्हसवडे (उपायुक्त, विक्रीकर विभाग), किशोर म्हसवडे (पोलीस उप अधीक्षक), अशोक पवार (पोलीस उप अधीक्षक), विशाल पांढरे (वैज्ञानिक अधिकारी, फॉरेन्सिक लॅब) यांच्यासारखे वरीष्ठ अधिकारी नाव लौकिक मिळवत असताना दरवर्षी बरेच प्रशासकीय अधिकारी या बोरगाव (माळेवाडी) या गावातून तयार होत असतात.

कठीण परिस्थितीशी संघर्ष करून श्री. विजय पांढरे यांनी बी. एस्सी. (ऍग्री) चे शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथे तर एम एस्सी (ऍग्री) चे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले. एम एस्सी (ऍग्री) चे शिक्षण पूर्ण करत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2012 साली घेतलेल्या त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी तर 2013 साली तालुका कृषी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. सन 2013 पासून ते आजपर्यंत 11.5 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची सेवाज्येष्ठतेनुसार कृषी उपसंचालक (मकृसे वर्ग 1, कृषी आयुक्तालय,) पुणे या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यानिमित्त बारामती झटका परिवार त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
marsbahis hacklink market casibom