उपोषणकर्ते संतोष माणिकराव पाटील यांची तब्येत खालावली; आयसीयू मध्ये केले दाखल…

महसूल व वन विभाग कक्ष अधिकारी गुरुदास बल्ला यांनी जिल्हाधिकारी सोलापूर व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे कार्यवाहीसाठी सादर..
गृह विभाग अवर सचिव दिलीप बागणे यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडे कार्यवाहीसाठी सादर…
वयोवृद्ध आई, पत्नी व लहान मुलगा व मुलीचे लक्ष लागले आझाद मुंबईकडे.
मुंबई (बारामती झटका)
गुरसाळे ता. माळशिरस, येथील खंडकरी शेतकरी स्वर्गीय माणिकराव पाटील यांचे चिरंजीव उपोषणकर्ते संतोष माणिकराव पाटील यांनी दि. 30/ 09/2024 रोजी पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे. संतोष पाटील यांची तब्येत खालावलेली असून त्यांना तातडीने आयसीयु रुग्णालयात दाखल केलेले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गुरसाळे गावाकडे वयोवृद्ध आई, पत्नी, लहान मुलगा व मुलीचे लक्ष आझाद मैदान मुंबईकडे लागलेले आहे. पाटील परिवार चिंतेमध्ये आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री. माणिक हरि पाटील या खंडकरी शेतकरी यांचा वारसदार आहे. दि. १३/०८/२०१३ रोजी आदेश क्रमांक ७४/२०१३ हा मिळालेला आहे. या संदर्भात मी व माझी आई इंदूबाई माणिक पाटील यांनी वारंवार प्रांत ऑफिस अकलुज येथे तोंडी व लेखी आदेशाप्रमाणे कब्जा मिळावा, अशी विनंती करुनसुध्दा कब्जा न दिल्यामुळे शेवटी माझ्या आईने दि. १५ जानेवारी २०१४ रोजी आत्मदहन केले व त्यासंदर्भात शिक्षा हि भोगली. पण, अद्याप आम्हाला आदेशाप्रमाणे पूर्णपणे कब्जा मिळालेला नाही.
तसेच मुलीवर अन्याय झाला असून अद्यापपर्यंत आरोपीला शिक्षा मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. अनेक मागण्यांसाठी त्यांनी प्रयत्न करूनसुद्धा प्रशासनाकडून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे संतोष पाटील यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी शेवटी आमरण उपोषण सुरु केलेले आहे. सदरच्या ठिकाणी खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे महाराष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी आझाद मैदान येथे भेटी घेतलेल्या आहेत.

आमरण उपोषणाची दखल घेऊन महसूल व वन विभाग कक्ष अधिकारी गुरुदास बल्ला यांनी जिल्हाधिकारी सोलापूर व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्याकडे कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच गृह विभाग अवर सचिव दिलीप बागणे यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडे कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार केलेला आहे.


पत्रव्यवहार करून अद्यापपर्यंत काहीही कार्यवाही झालेली नसल्याने उपोषणकर्ते संतोष पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. गेली १३-१४ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते संतोष पाटील यांची तब्येत खालावलेली असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलेले आहे. आई, पत्नी मुलगा व मुलगी चिंतेमध्ये आहेत. आमच्या घरातील कर्ता पुरुष एवढे दिवस आमरण उपोषण सुरू आहे तरीसुद्धा प्रशासन पत्रव्यवहार करून दखल का घेत नाही. जर संतोष पाटील यांच्या जीवितास काही बरे वाईट झाले तर संबंधित तक्रारी मधील लोक व प्रशासनातील अधिकारी जबाबदार राहतील अशी भावना उपोषण कर्ते संतोष पाटील यांच्या परिवारांची झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.