श्रीराम कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे माळशिरस येथे स्वागत

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस (ता. माळशिरस) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय, पानीव येथील चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या कृषीकन्यांचे आगमन झाले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येतो. कृषीकन्या ह्या पुढील तीन महिने गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहत.
विविध पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान, कृषीपुरक व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान तसेच जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतींची माहिती कृषीकन्या देणार आहेत.

यावेळी माळशिरस तालुक्याचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर, कृषीकन्या वैष्णवी पवार, श्वेता पोरे, प्रणिता दगडे, साक्षी भोसले, मेघा राऊत, उपस्थित होत्या. यासाठी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शिका श्रीलेखा पाटील, सचिव ॲड. अभिषेक पाटील, सहसचिव करण पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद झगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरि हाके, उपप्राचार्य डॉ. सुरजकुमार राऊत, कार्यकारी अधिकारी डॉ. जबिन शेख यांचे या उपक्रमास मार्गदर्शन लाभले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.