श्रीराम शिक्षण संस्थेत बी.ए.एम.एस. महाविद्यालयास मंजुरी

पानीव (बारामती झटका)
पानीव (ता. माळशिरस) येथील श्रीराम शिक्षण संस्थेस बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनाची व एन.सी.आय.एस.एम दिल्ली यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. चालू शैक्षणिक २४-२५ वर्षात हा अभ्यासक्रम संस्थेत सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.
पुढे बोलताना प्रकाश पाटील म्हणाले की, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, भारत सरकार दिल्ली, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून महाविद्यालय सुरू करण्याबाबतची शिफारस मिळाली. यानंतर भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, भारत सरकार दिल्ली यांचे पत्र संस्थेस नुकतेच प्राप्त झाले आहे. यानुसार शामराव पाटील आयुर्वेद रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल, पानीव (बी.ए.एम.एस.) महाविद्यालयास चालू शैक्षणिक वर्षासाठी ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमास शासनाची मान्यता मिळालेली आहे. संस्थेत बी.ए.एम.एस. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष करण (भैय्या) पाटील, सचिव ॲड. अभिषेक (भैय्या) पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील व विशेष कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी यांनी नवीन महाविद्यालय सुरु होत असल्याबाबत संस्थेचे हार्दिक अभिनंदन केले.

श्रीराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कला, वाणिज्य, कृषी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र विज्ञान, माहिती व तंत्रज्ञान, संगणक, अशा विविध शाखांतून केजी टू पीजी शिक्षण दिले जाते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.