वेळापूर येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५६ बॉटल रक्तसंकलन
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वेळापूर येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच जीवन जानकर, वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर झेंडावंदन वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर ग्रामस्थ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच लहुजी चौक वेळापूर व अण्णाभाऊ साठे स्मारक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झेंडावंदन मेजर निशिकांत शिंदे, पोलीस कर्मचारी पंडित देशमुख, गणेश क्षीरसागर, यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर रक्तदान शिबिरासाठी सिद्धेश्वर ब्लड सेंटर सोलापूर यांनी सहकार्य केले.

यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरणजी साठे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. धनंजय साठे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब जाधव, रिपाई आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर, महाराष्ट्र विकास सेनेचे अजित साठे, अण्णाभाऊ साठे जयंती समिती अध्यक्ष नितीन साठे, माजी उपसरपंच जावेद मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वायदंडे, पांडू साठे, संजय देशपांडे, काशिनाथ आडत, गणेश चव्हाण, आंबेडकर चळवळीचे नेते विजयभाऊ बनसोडे, महेंद्र साठे, प्रदीप सरवदे, भैय्या कोडग, उमेश भाकरे, दादाराजे घाडगे, स्वप्नील माने – देशमुख, लक्ष्मण माने-देशमुख, संदीप कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष युवराज मंडले, मिलिंद गायकवाड, प्रशांत खिलारे, धनाजी साठे, गणेश साठे, महेश साठे, स्वप्निल सरवदे, राहुल साठे, जब्बार मुलाणी, संजय पनासे, पिनू येडगे, अमोल साठे, योगेश भिंगारदिवे, अशोक पवार, महादेव जाधव व समस्त मातंग समाज बांधव उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.