जिल्हा परिषद सोलापूरचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांची बदली अतिरिक्त महापालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर श्री. कुशल जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, वित्त व लेखा अधिकारी मिनाक्षी वाकडे आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



