अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहाचा प्रश्न निकाली निघणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांची समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांनी सदिच्छा भेट घेतली..
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री. एस कार्तिकेयन यांची सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्तीगृहाच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.

प्राधान्याने अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृहाविषयी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला असल्याने अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहाचा प्रश्न निकाली निघणार आहे..

अकलूज येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह अकलूज येथे अनेक वर्षापासून स्वतःच्या इमारतीपासून वंचित आहे. तात्पुरत्या भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र मालकी हक्काची जागा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे असल्याचे सभापती संस्कृतीताई सातपुते यांनी वास्तव परिस्थितीवर चर्चा केल्यानंतर लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आश्वासित केले आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



