लिपिक वर्गीय संघटना (615) राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक सोलापूर येथे संपन्न, लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड

सोलापूर (बारामती झटका)
दि. 12/04/2026 रोजी सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक सोलापूर येथे संपन्न झाली. या संवाद बैठकीत जिल्हा परिषद लिपिकांचे पदोन्नती टप्पे कमी करून लिपीकांना वर्ग-१ पर्यंतचे वेतन कसे मिळेल, यावर चर्चात्मक संवाद साधला गेला. या बैठकीत लिपिक वर्गीय संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर व लिपिक वर्गीय संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सुर्यवंशी यांनी लिपिकांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी जिल्हा परिषद लिपीकांची वेतनत्रुटी आहे काय ?, या प्रश्नापासून सुरुवात करून लिपीकांचे पदोन्नती टप्पे कमी करून त्यानुसार वर्ग-१ पर्यंतचे वेतन जिल्हा परिषद लिपीकांना कसे मिळवून देता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शना दरम्यान उपस्थित प्रत्येक लिपीकांचे प्रश्नावर संवाद साधला गेला.
लिपीकांच्या वेतन त्रुटीचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, परंतु शासन त्याला का मान्यता देत नाही यावर त्यांनी सांगितले की, आपण आपल्या पदांची तुलना तांत्रिक पदांसोबत करत आहोत, इथेच आपण चुकत आहोत. आपण जिल्हा परिषद लिपिक आहोत तर आपण आपली तुलना राज्य शासनाच्या कार्यालयातील लिपिकांशीच केली पाहिजे. परंतु, आपण तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांसोबत तुलना करत आहोत, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लिपीकांच्या वेतनत्रुटीचा विषय शासन दरबारी मान्य होत नाही. त्यामुळे लिपीक संघटनेने शासनाकडे निवेदन देऊन राज्यशासनाकडील कार्यालयातील लिपीकांचे टप्यांप्रमाणे जिल्हा परिषदेकडील लिपीकांचे चार टप्यांऐवजी दोन टप्पे करावेत. तसे करताना मंजुर पदांची संख्या कमी करू नये. किंबहुना जिल्हा परिषदेकडील कामांची व्याप्ती पाहून सदर पदांमध्ये वाढ करावी, अशी मागणी लावून धरली आहे.

जिल्हा परिषदेच्या लिपीकांचे पदोन्नती टप्पे कमी करणे याविषयी मा. आमदार सत्यजितभाऊ देशमुख शिराळा विधानसभा, जि. सांगली यांचे प्रयत्नातून राज्याचे ग्रामविकास मंत्री महोदय मा. नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचेकडे झालेल्या बैठकांबाबतची सविस्तर माहिती यावेळी दिली. त्यामुळे शासन पातळीवर प्रस्तावित कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी दोन पदे लवकरच एक होतील. त्यासाठी लिपीक संघटना प्रयत्नशील आहे. याचा फायदा कनिष्ठ लिपीकांपर्यत कसा होईल, या विषयावर सखोल चर्चा यावेळी झाली. ही मागणी मान्य झाल्यास अश्वासित प्रगती योजनेमुळे कार्यरत लिपीकांना वरच्या पदांची वेतनश्रेणी मिळणार असून त्यानुसार वेतनत्रुटी कशा प्रकारे दूर होईल, याबाबत उदाहरणांसह माहिती राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी दिली. तसेच वरिष्ठ सहाय्यक लिपीक आणि कनिष्ठ सहाय्यक लिपीक ही दोन पदेही एकत्र करण्यासाठी मा. नामदार जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास यांचेकडे मा. आमदार सत्यजितभाऊ देशमुख यांचेमार्फत लिपीक संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. या विषयाचीही फाईल लवकरच प्रस्तावित होईल, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ही दोन पदे एकत्र केल्यास शासनास काय फायदा होईल ? तसेच या पदांचे कामकाजात कशा प्रकारची समानता आहे, याबाबतचा अहवाल शासनाकडून मागितला जाणार आहे. अशी माहिती संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी दिली. सध्या किमान एक टप्पा कमी होणार आहे, तो करून घेऊया. राहिलेली मागणी पुन्हा जोरकसपणे शासनाकडे रेटूया, अशी संघटनेची सध्याची भूमिका असल्याची माहिती यावेळी दिली.
बैठक सुरू होण्यापूर्वी सोलापूर येथील लिपिक नेते कै. विवेक लिंगराज, कुर्डूवाडीचे कै. सयाजी बागल, साप्रवि चे कै. विशाल उंबरे सह ज्ञात अज्ञात लीपिकाना श्रध्दांजली वाहण्यात आली. सदरील बैठकीस राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा लिपिक कार्यकारिणीकडून लिपीक संवाद बैठकीचे उत्कृष्ट नियोजन सर्व लिपीक बंधूनी केले.
या बैठकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील लिपिकांनी जिल्हा अध्यक्ष पदी बहुमताने श्री. अविनाश गोडसे यांची निवड केली. तसेच सोलापूर जिल्हा नविन कार्यकारिणी निवड केली. नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार राज्यअध्यक्ष सागर बाबर यांनी केला व पुढील संघटनात्मक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद नांदेड येथून विभागीय अध्यक्ष अशोक कासराळीकर, जिल्हाध्यक्ष कमल दर्डा, जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, सचिव बालाजी अटकळे, कार्याध्यक्ष विजय थोरात, कोषाध्यक्ष रवि कांबळे, सल्लागार शिवसांभ चेड्डु, उपाध्यक्ष ओंकार पांचाळ, सहकोषाध्यक्ष ठोंबरे, अनिल जगताप, नागेश पाटील, नागेश धोत्रे, सूर्यकांत मोहिते, कुमारगौरव शिंदे, हनुमंत भोसले, दिनेश बनसोडे, विजय कुलकर्णी, सचिन मायनाळ, सचिन घोडके, संजय गौडगाव, इरांना भरडे, आनंद साठे, महेश शेंडगे, विष्णू पाटील, सुमित कांबळे, अमोल धाकपडे, दिलीप भोसले, संतोष सातपुते, एस. एस. कुंभार, एस. डी. गुरव, कोमारी, रमाकांत उकिरडे, डी. ए. लांगोटे, के. एन. खुर्द, एस. एस. मोरे, एस. एस. देशमाने, निंबाळकर, विजय रणदिवे, एस. एन. बडे, संभाजी जाधव, प्रमोद यादव, आर. सी. लोखंडे, एस. जी. शेळके, ए. व्ही. सावंत, एस. ए. कानडे, बी. एस. झालते, एम. एस. गिराम, एस. टी. लमकाने, सी. एस. भोसले, आय. ए. सय्यद, एस. आर. जाधव, महेश कुलकर्णी, ज्ञानेश्वर केंगार, विरकुमार देशमुख, पांडुरंग दराडे, अजय रंगदाळ, प्रवीण डोळे, राहुल मुंढे, रणजित कांबळे, स्वप्नील कोरे, अनिल खडतरे, एस. ए. देशमुख आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दिनेश काळे यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



