सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा…
पालकमंत्री झाल्यानंतर पहिला मान माढा तालुक्याला
माढा (बारामती झटका)
ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झाला आहे. पालकमंत्री झाल्यानंतर पहिला मान त्यांनी माढा तालुक्याला दिला आहे.
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय माजी आमदार शामराव भीमराव पाटील उर्फ भाऊ यांनी स्वर्गीय विजयराव शामराव पाटील उर्फ आबा यांच्या संकल्पनेतून श्रीराम सिनेमा अकलूज येथे सुरू केलेला होता. टेंभुर्णीच्या नागरिकांनाही सिनेमाचा आस्वाद घेता यावा, म्हणून 1985 साली एका तंबूमध्ये सिनेमा सुरू केलेला होता. नंतर त्याच ठिकाणी जानकी सिनेमा इमारत स्वरूपात थेटर उभा केलेले होते. भाऊंनी व आबांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. टेंभुर्णी येथे सुमन सिनेप्लेक्स टेंभुर्णी येथे आज दि. मंगळवार दि. 21 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 05 वा. थाटात व दिमाखात उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
यावेळी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तर माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माढा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बबनदादा शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झाला आहे.
त्यामध्ये दु. १.४५ वा. मंत्रालय, मुंबई येथून शासकीय वाहनाने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई सांताक्रुझ, मुंबई कडे प्रयाण., दु. २.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई सांताक्रुझ, मुंबई येथे आगमन व विमानाने बारामती जि. पुणे कडे प्रयाण., दु. ३.१५ वा. विमानतळ बारामती जि. पुणे येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, बारामती कडे प्रयाण., दु. ३.३० वा. शासकीय विश्रामगृह, बारामती येथे आगमन व राखीव., दु. ३.४५ वा. शासकीय विश्रामगृह, बारामती येथून टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूरकडे प्रयाण., सायं. ५.०० वा. टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर येथे आगमन व सुमन सिनेप्लेक्स सिनेमागृहाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ – टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर., सायं. ६.३० वा. संपर्क – श्री. प्रकाश बापू पाटील, मो.क्र. ९९७०७८८८८८, टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर येथून शासकीय वाहनाने विश्रामगृह बारामती जि. पुणे कडे प्रयाण., रात्री. ७.३० वा. विश्रामगृह बारामती जि. पुणे येथे आगमन व राखीव., रात्री. ८.३० वा. विश्रामगृह बारामती जि. पुणे येथून निवासस्थान, बोराटवाडी ता. माण जि. सातारा कडे प्रयाण., रात्री. १०.०० वा. निवासस्थान, बोराटवाडी ता. माण जि. सातारा येथे आगमन, राखीव व मुक्काम, असा त्यांचा दौरा असणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.