ताज्या बातम्या

चि. सौ. कां. ऋतुजा माने, कण्हेर व चि. अभिजीत लोखंडे, डोंबाळवाडी(खुडूस) यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार..

प्रेषक – श्री. धनाजी तात्यासो माने, माजी सरपंच कण्हेर, श्री. धर्मराज वसंत माने युवा नेते कण्हेर

कण्हेर (बारामती झटका)

श्री. तात्यासो सखाराम माने यांची नात व श्री. मनोहर तात्यासो माने, रा. कण्हेर, ता. माळशिरस यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ. कां‌. ऋतुजा आणि श्री. भिकू कृष्णा लोखंडे यांचे नातू व श्री. तानाजी भिकू लोखंडे, रा. डोंबाळवाडी (खुडूस), ता. माळशिरस यांचे द्वितीय सुपुत्र चिरंजीव अभिजीत यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. 22/07/2024 रोजी दुपारी 12 वाजून 41 मिनिटे या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, 61 फाटा माळशिरस अकलूज रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभकार्यास उपस्थित राहावे, असे प्रेषक कण्हेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. धनाजी तात्यासो माने व कण्हेर गावचे युवा नेते श्री. धर्मराज वसंत माने यांनी लग्नकार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे.

प्रथम पूजा श्री गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती, ईश्वराच्या दैव हाती, शिंपल्यातून निघते मोती, तोच जुळवितो नातीगोती, वधु वर पुष्पहार आणि स्वागत करती, वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यास यावे असे आपले स्नेहांकित श्री. तात्यासो सखाराम माने, सौ. चांगुणा व श्री. वसंत सखाराम माने, सौ. छबाबाई व श्री. दादासो सखाराम माने, सौ. ताई व श्री. शिवाजी सखाराम माने आणि समस्त माने परिवार कण्हेर यांच्या वतीने आग्रहाचे आमंत्रण आहे.

माने व लोखंडे परिवारांच्या शुभ कार्याचे स्वागतोत्सुक कण्हेर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री. दादासो सखाराम माने, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामदास शंकर माने, युवा नेते श्री. महादेव रामचंद्र वाघमोडे, रेडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री. पोपट लहू दडस, उद्योजक श्री. दीपकदादा सदाशिव देवकते, युवा नेते श्री. आप्पासो गोपाळ माने, डॉ. श्री. राजेंद्र शिवाजी माने, श्री. हनुमंत ज्ञानदेव माने सर, ॲड. श्री. महादेव हनुमंत माने, सेंट्रल रिझर्व पोलीस श्री. भाऊसो गोपाळ माने, कृषी सहाय्यक श्री. लालासो बापूराव माने, डॉ. श्री. अप्पा दादासो माने हे करणार आहेत.

लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे कण्हेर गावचे माझे सरपंच श्री. धनाजी तात्यासो माने व कण्हेर गावचे युवा नेते श्री. धर्मराज वसंतराव माने आणि समस्त माने परिवार कण्हेर यांच्या वतीने लग्नकार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button