सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांची जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड औपचारिक घोषणा बाकी…..

सोलापूर (बारामती झटका)
दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांची जिल्हा परिषद सोलापूर समाज कल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड होणार औपचारिक घोषणा बाकी आहे…
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वर्चस्व निर्माण करून जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या निवडी केल्यानंतर आज पाच सभापती पदाच्या निवडी जिल्हा परिषदमध्ये सुरू आहेत.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी दैदीप्यमान विजय मिळवलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा परिषद उमेदवार जीवन कुमार उत्तमराव जानकर व पंचायत समिती उमेदवार अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केलेला होता. माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच मोहिते पाटील व जानकर यांचा एकाच वेळी पराभव करणाऱ्या संस्कृती सौ. संस्कृतीताई जॉईंट किलर ठरलेल्या होत्या. संस्कृतीताई यांच्या विजयाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पालकमंत्री जयकुमार गोरे व भारतीय जनता पार्टीने संस्कृतीताई यांना समाज कल्याण सभापती होण्याचा बहुमान दिलेला आहे. पिलीव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री. चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांनी सुद्धा संस्कृतीताई सातपुते यांना सभापती पद द्यावे अशी नेते मंडळी व भाजपकडे मागणी केलेली होती..
मोहिते पाटील व जानकर दोन्ही गटांना खऱ्या अर्थाने लढा उभा करणारे माजी आमदार राम सातपुते यांना भारतीय जनता पार्टी व वरिष्ठ नेतृत्व यांनी ताकद देण्याच्या दृष्टीने समाज कल्याण सभापती पदी संस्कृतीताई यांची नियुक्ती करून माजी आमदार राम सातपुते यांच्या लढ्याला एक प्रकारे बळ दिलेले आहे. सौ. संस्कृतीताई सातपुते यांची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अपर जिल्हाधिकारी सोलापूर तथा, पीठासीन अधिकारी विषय समिती सभापती गणेश निऱ्हाळी यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या समवेत नातेपुते मंडलचे उपाध्यक्ष व राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे उपस्थित होते. सदरच्या नामनिर्देश पत्रावर सूचक म्हणून गटनेते रश्मीताई बागल व इंद्रजीत पवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दहा ते बारा नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ होती. समाज कल्याण पदासाठी एकच नामनिर्देशन आलेले असल्याने दुपारी दोन वाजता सभापती पदाची घोषणा औपचारिक बाकी राहिलेली आहे. माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये सभापती पदांच्या निवडीचे जल्लोष व स्वागत करण्यात येत आहे. संस्कृतीताई सातपुते बिनविरोध समाज कल्याण सभापतीपदी विराजमान होणार असल्याने माळशिरस तालुक्यात राम सातपुते समर्थक व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. ठीक ठिकाणी स्वागताचे बॅनर लागलेले आहेत. दसुरपाटी ते वेळापूर चौकापर्यंत सत्तावीस बॅनर कार्यकर्त्यांनी उभा केलेले आहेत. तालुक्यात संस्कृतीताई यांचे जंगी स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



