स्त्री भ्रूण हत्येचे माळशिरसमधील डॉक्टरांचे बार्शी नंतर वाई येथे कनेक्शन.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायत हद्दीतील डॉक्टरांचे बार्शी पोलीस स्टेशन येथे स्त्री भ्रूण हत्येचे भागीदार असल्याने दोन दिवस बार्शी पोलीस स्टेशन येथे घेऊन गेलेले होते. तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा धुराळा उडाला होता. चर्चेचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच वाई पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिर्के व त्यांचे सहकारी यांनी माळशिरस शहरातील डॉक्टरांच्या घराला स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने वेढा दिलेला होता. मात्र, डॉक्टर प्रसार झालेले असल्याने हाती लागलेले नाहीत. स्त्री भ्रूण हत्येचे माळशिरस मधील डॉक्टरांचे बार्शी नंतर वाई येथे कनेक्शन असल्याची चर्चा डॉक्टरांच्या निवासस्थानाशेजारील नागरिक व माळशिरस शहरात चर्चेचा विषय बनलेला आहे.
वाई पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 313 अन्वये गुन्हा रजिस्टर झालेला आहे. सदरच्या पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल 1676 शिर्के व दोन सहकारी माळशिरस नगरपंचायत हद्दीतील डॉक्टरांना तपास कामी घेऊन जाण्यासाठी आलेले होते. माळशिरस पोलीस स्टेशनच्या सहकार्याने डॉक्टरांच्या घराला वेढा दिलेला होता. डॉक्टरांच्या घराच्या आसपासच्या नागरिकांमध्ये कुजबुज सुरू होती. कानोकानी माळशिरस शहरात चर्चेला उधाण आलेले आहे.
सदरच्या वेढ्यामध्ये डॉक्टर पसार झालेले असल्याने हाती लागलेले नव्हते. बार्शी पोलीस स्टेशन येथे पुढे काय झाले याची चर्चा सुरू असतानाच वाई पोलीस स्टेशन पुढे काय करणार, याची उत्सुकता माळशिरसकरांना लागून राहिलेली आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे पातक निश्चितपणे डॉक्टर नराधमांना धडा शिकवल्याशिवाय जागृत देवस्थान हनुमान शांत बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एक माळशिरसकर यांनी दिलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.