कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांची खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात अधिकाऱ्यांना घेराव घालणार.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दुधाला 34 रुपये दर निश्चित करा

माळशिरस (बारामती झटका)

दुधाला 34 रुपये दर निश्चित करा तसे न केल्यास जे दूध संघ शासकीय जीआर चे उल्लंघन करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नाईलाजाने रस्त्यावरची लढाई लढत सोलापुरात दुग्धविकास अधिकारी यांना सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल यांच्या सहकार्याने अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घातला जाईल, असा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर यांनी संतप्त इशारा दिलेला आहे.

महाराष्ट्र शासनाने दुधाच्या संदर्भामध्ये 14 जुलै 2023 रोजी एक शासनाने जीआर काढलेला होता. त्यामध्ये जी दूध नियंत्रण समिती होती त्यांनी दुधाला 34 रुपये दर निश्चित केलेला होता. या समितीमध्ये असे ठरलेले होते की, पुन्हा तीन महिन्यांनी समितीची बैठक होईल त्यावेळेस पुढील दुधाचे दर निश्चित केले जातील. आतापर्यंत दूध दर नियंत्रण समितीची कोणतीही बैठक झालेली नसताना खाजगी व सहकारी संस्थांनी दुधाचे दर हे प्रति लिटर 27 ते 25 रुपये इतके केलेले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. पशुखाद्याचे व जनावरांच्या चाऱ्याचे वाढलेले दर पाहता हा धंदा सध्या तोट्याचा झालेला आहे. शासन एखादा निर्णय ज्यावेळेस करते त्यावेळेस त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हे सर्व यंत्रणेचे काम असते. परंतु, आज या संस्था कोणाच्याही दबावला भिक घालत नाहीत. जे संघ यापुढे दुधाला 34 रुपये दर देणार नाहीत त्यांचे परवाने निलंबित करून ते संघ शासनाने ताब्यात घ्यावेत, असे निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने-देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, युवा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, विधानसभा प्रमुख साहिल आतार, डॉ. धनंजय म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत ठवरे, जब्बार आतार, शैलेश भाकरे, संजय भाकरे, सचिन बोरकर, मुसा शिंदे, दादा काळे, बंटी माने, शुभम माने, राजेश खरात, शिवाजी वाघमारे, गणेश वळकुंदे, मायाप्पा सुळे, विजय वाघबंरे किशोर गोरवे, संदीप कपने आदि कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा आशावाद दूध उत्पादक शेतकरी यांना वाटत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button