स्वतंत्र अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बुलढाण्यात उत्साहात सुरुवात

बुलढाणा (बारामती झटका)
केंद्र शासनाच्या सन 2022 पासून सुरू असलेली ‘हर घर तिरंगा’ मोहिम 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सुरू करण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत 13 ऑगस्टला बुलढाणा नगरपरिषदेच्या माध्यमातून अभियानाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. देशभक्तीची भावना जागृत ठेवून भारतीय राष्ट्रध्वजाचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्यासाठी आणि राष्ट्रीय ऐक्य दृढ करण्यासाठी जनजागृती करीत ही मोहीम राबविण्यात आली आहे.
नगरपरिषद, बुलढाणा यांच्या वतीने शहरातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी शहराच्या प्रमुख मार्गावर तिरंगा रॅली काढून देशभक्तीचा संदेश दिला. रॅलीची सुरुवात महात्मा गांधी पुतळा पासून स्टेट बँक चौक, बाजारपेठ, महावीर मार्ग, कारंजा चौक अशा विविध मार्गांवरून होत पुन्हा प्रारंभिक स्थळी समारोप करण्यात आला.


रॅलीत सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक व नगरपरिषद कर्मचारी यांनी हातात तिरंगा घेऊन ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमवला. यावेळी मुख्याधिकारी गणेश पांडे, उपमुख्यधिकारी डॉ. योगेश सावळे, पाणीपुरवठा इंजि. राजेश गायकवाड, आरोग्य विभागाचे अधीक्षक सुनील बेडवाल, उमेश काकड, योगेश घुगे, आशिष फोकाटे, गजानन गोरे, सुहास पवार, विशाल हिवाळे यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.


नगरपरिषदेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला यशस्वी करावे आणि राष्ट्रप्रेमाचा गौरव वाढवावा. – गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, बुलढाणा

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



