तालुका कृषी अधिकारी महेश देवकते यांचा मित्र परिवारांच्या वतीने सन्मान संपन्न…

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका कृषी कार्यालयात अकलूज मंडल कृषी अधिकारी पदावर कार्यरत असणारे महेश देवकते यांची तालुका कृषी अधिकारी लोहारा येथे पदावर बढती मिळालेली असल्याने नूतन तालुका कृषी अधिकारी महेश देवकते यांचा सन्मान माळशिरस येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौकामध्ये मित्रपरिवारांच्या वतीने करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, दादासाहेब हुलगे, गोविंद कर्णवर-पाटील, नागेश मालक वाघमोडे, तायाप्पा गोरड, आबा पिंगळे, मच्छिंद्र गोरड, नगरसेवक धनाजी देवकर, संपादक श्रीनिवास कदम-पाटील, शशिकांत म्हमाणे आदी उपस्थित होते.
तालुका कृषी कार्यालय माळशिरस येथील मंडल कृषी कार्यालय, अकलूज येथे कार्यरत असताना महेश देवकते शेतकऱ्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करीत होते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन नोकरी करीत होते. आपल्या ज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. त्यांना बढती मिळून तालुका कृषी अधिकारी पदावर लोहारा येथे काम करण्याची संधी मिळालेली आहे. निश्चितपणे आपल्या कार्याचा ठसा उमटवून सर्वसामान्य गोरगरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.