ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना महायुतीची सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर…

सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीने माळशिरस विधानसभेला विकासाचा पुन्हा वनवास, लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी रामराज्य निर्माण केले होते.

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची महायुतीने उमेदवारी जाहीर केलेली आहे. सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीने माळशिरस तालुक्यात विकासाचा महामेरू उभा करून विकासाची गंगा माळशिरस तालुक्यात वाहत होती. नावातच राम नाही तर आपले कार्यकर्तृत्व दाखवून रामराज्य निर्माण केलेले होते‌. सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीने माळशिरस विधानसभेला विकासाचा पुन्हा वनवास येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी आमदार राम सातपुते यांच्यातील कार्यकर्तुत्व, गुण पक्षनिष्ठा व नेत्यांचा आदेश, मानसन्मान या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून माळशिरस विधानसभेची भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिलेली होती. ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी देऊन खऱ्या अर्थाने कार्य करणाऱ्या व निष्ठावान कार्यकर्त्याला ताकद दिलेली होती.

माळशिरस विधानसभेच्या इतिहासात सर्वात कमी मताधिक्याने निवडून येऊन सुद्धा सर्वात जास्त विकासाचा निधी आणलेले एकमेव आमदार ठरलेले आहेत‌. माळशिरस तालुक्यातील जनतेला जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे. कामाच्या अनुषंगाने जागेवरच फोन करून अडचणीतील लोकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. माळशिरस तालुक्यात विकासाचा डोंगर उभा केलेला आहे. अशा कर्तृत्ववान आमदारास सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी माळशिरस तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेने देव पाण्यात ठेवलेले होते. माळशिरस तालुक्याला खऱ्या अर्थाने गोरगरिबांचा आमदार लाभले होते. सोलापूर लोकसभेचे खासदार होणार यापेक्षा माळशिरस तालुक्याचे आमदार रहावे, अशी अपेक्षा होती. मात्र, देशामध्ये असे एकमेव उमेदवार झालेले आहेत, न मागता, कोणीही शिफारस न करता लोकसभेची उमेदवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाविजय संयोजनप्रमुख आमदार श्रीकांतजी भारतीय व पार्लमेंटरी बोर्डाने विश्वास टाकून तिकीट जाहीर केले. याचाही माळशिरस तालुक्यातील जनतेला आनंद होत आहे कारण, भलेभले दमले, जंग जंग पछाडले, तरीसुद्धा उमेदवारी मिळत नसते.

कार्य कर्तुत्ववान लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना खासदारकीची उमेदवारी चालून आलेली आहे. निश्चितपणे सोलापूर लोकसभेचे खासदार झाल्यानंतर मतदार संघ देशाच्या चर्चेत राहील, असा विश्वास लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या समर्थकांमधून व्यक्त केला जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

19 Comments

  1. legitimate canadian online pharmacies [url=https://canadaph24.pro/#]Licensed Canadian Pharmacy[/url] canadian pharmacy scam

  2. propecia medication [url=https://finasteride.store/#]propecia brand name[/url] buying propecia online

  3. buy cytotec over the counter [url=http://cytotec.club/#]purchase cytotec[/url] cytotec buy online usa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort