ताज्या बातम्यासामाजिक

अंतरवाली सराटी येथील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेवरून येताना माळशिरस तालुक्यातील व्यक्तीचा अपघाती मृत्यू….

माळशिरस तालुक्यातील मांडकी ग्रामपंचायतचे माजी सदस्य हनुमंत लालासो रणनवरे यांचे मोटर सायकल अपघातात बीड येथे दुःखद निधन.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील मांडकी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत लालासो रणनवरे यांचा बीड येथे मोटरसायकल डिव्हायडरला धडकून रविवार दि. 24/03/2024 रोजी अपघात झाला. सदरच्या अपघातामध्ये हनुमंत रणनवरे यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीला मार लागलेला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभा आटपून मांडकी, ता. माळशिरस, येथील गावाकडे परत येत असताना बीड येथे मोटरसायकल अपघात झाला. सदरच्या अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू समय ते पन्नास वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे त्यांच्यावर आजच रात्री 9.30 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

हनुमंतराव रणनवरे यांचे अपघातामध्ये दुःखद निधनाची वार्ता माळशिरस तालुक्यात पसरल्यानंतर तालुक्यामधील मराठा बांधवांमध्ये शोककळा पसरलेली आहे. शेती व्यवसाय बरोबरच हॉटेल व्यवसायावर त्यांची उपजीविका होती. चळवळीमध्ये काम करीत असताना हनुमंत रणनवरे यांनी कार्यातून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली होती. त्यांचे सर्व जाती धर्मातील लोकांशी सलोख्याचे संबंध होते. हनुमंतराव रणनवरे यांच्या दुःखद निधनाने मांडकी पंचक्रोशी व रणनवरे परिवारावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे.

त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व रणनवरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort