टणू ते चांदज रस्त्यासह भीमा नदीवरील पुलासाठी नाबार्ड मधून 25 कोटी निधी मंजूर
माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला – युवा नेते रणजीतभैया शिंदे
माढा (बारामती झटका)
इंदापूर तालुक्यातील टणू ते माढा तालुक्यातील चांदज या दोन गावांना जोडणारा रस्ता व त्याच रस्त्यावर भीमा नदीवरील पुलासाठी नाबार्ड मधून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे यांनी शासन दरबारी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नातून 25 कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.
टणू व चांदज या दोन गावांमधून भीमा नदी वाहते. त्यामुळे माढा तालुक्यातील कोंढार भागातील आढेगाव, वडोली, रांझणी, टाकळी व नगोर्ली आणि इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बु., गिरवी या गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी सुमारे 10 किमी वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील लोकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. या भागात ऊस व विविध फळबागांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मालाची ने-आण करताना शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. या भागातील विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी शाळेला ये-जा करताना मोठी गैरसोय होत होती. आदी बाबी लक्षात घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश मिळाले असून शासनाच्या नाबार्ड अंतर्गत या दोन गावांना जोडणारा रस्ता व भीमा नदीवरील पुलासाठी हा भरीव निधी मंजूर झाला आहे.
हा निधी मंजूर केल्याबद्दल या भागातील शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर माढा व इंदापूर हे दोन तालुके या मार्गाने जोडले जाणार आहेत. त्यामुळे या भागातील दळणवळणाची यंत्रणा वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, fantastic blog layout! How long have you ever
been running a blog for? you make running a blog look easy.
The overall glance of your web site is fantastic, let alone the content!
You can see similar here najlepszy sklep