चांदापुरी गावचे सुपुत्र मेजर श्री. राजाराम बबन मगर यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न होणार आहे….

माळशिरस तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती कार्यक्रम होणार, सर्वांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रक संजय बबन मगर यांचे आवाहन..
चांदापुरी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी गावचे सुपुत्र मेजर राजाराम बबन मगर वीस वर्ष देशाची यशस्वीरित्या सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत असल्याने रविवार दि. १ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता ओंकार साखर कारखाना, चांदापुरी, ता. माळशिरस येथे सेवापूर्ती सत्कार सोहळा लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थ यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे निमंत्रक श्री. संजय बबन मगर व समस्त मगर परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

“मंजिले उन्हीको को मिलती है, जिसके सपनो मे जान होती है |
पंखों से कुछ नही होता, हौसलों से उडाण होती है ||”
याप्रमाणे मेजर श्री. राजाराम बबन मगर यांनी भारत मातेची १२ मराठा लाईट इन्फंट्री रिजिमेंट मधून २० वर्ष यशस्वीरित्या सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल सेवापूर्ती सत्कार समारंभ समस्त चांदापुरी ग्रामस्थ व मगर परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. रविवारी दुपारी ३ ते ४ भव्य मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी ५ वाजता माळशिरस तालुक्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक अशा अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी सर्वांनी सत्कार सोहळा व स्नेहभोजनास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन चांदापुरी गावचे लोकनियुक्त सरपंच जयवंत अण्णा सुळ व कार्यक्रमाचे निमंत्रक संजय बबन मगर व समस्त मगर परिवार यांच्या वतीने मित्रपरिवार व नातेवाईक करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng