ताज्या बातम्यासामाजिक

सदाशिवनगर येथील प्रज्योततात्या सालगुडे पाटील मंडळाच्या गणेश उत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन पाहावयास मिळाले…

प्रज्योततात्या सालगुडे पाटील मित्र मंडळ व गणेश उत्सव मित्र मंडळाच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे…

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस येथील प्रज्योततात्या सालगुडे पाटील मित्र मंडळ व गणेश उत्सव मंडळ यांच्या गणपती उत्सवातील मानाची आरती सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ सदस्या सौ. शाबिरा मकबूल मुलाणी व ज्येष्ठ नेते श्री. मकबूल गुलाब मुलाणी या उभय मुस्लिम दांपत्यांच्या शुभ हस्ते महाआरती करून गणेश उत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन पहावयास मिळालेले आहे. आज दि. 27/09/2023 रोजी दुपारी तीन वाजता मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. मित्रपरिवार, नातेवाईक व सदाशिवनगर पंचक्रोशीतील सर्व गणेशभक्तांना प्रज्योततात्या सालगुडे पाटील गणेशोत्सव मंडळ, सदाशिवनगर यांच्यावतीने महाप्रसादासाठी उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आलेले आहे.

प्रज्योततात्या सालगुडे पाटील मित्र मंडळ व गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचबरोबर सर्व जाती धर्मात सलोखा नांदावा यासाठी कायम मंडळाचे सकारात्मक कार्य असते. गणपती उत्सवात मुस्लिम दांपत्य यांच्या शुभहस्ते महाआरती करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून आणलेले आहे.

सदाशिवनगर येथे मुस्लिम समाजातील सौ. शाबिरा व श्री. मकबूल मुलाणी आदर्श दांपत्य आहे. त्यांनी आपली मुले उच्चशिक्षित केले असून पोलीस प्रशासन सेवेमध्ये ते कार्यरत आहेत. उद्योग व्यवसायामध्ये आपली स्वतःची प्रगती करून सर्व जाती धर्मात आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. अशा सुसंस्कृत मुलाणी दांपत्य यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी डोक्यावर मराठामोळा तुरेबाज फेटा मकबुल मुलाणी यांना बांधलेला होता तर शाबिरा मुलाणी यांनी भारतीय संस्कृती जपत डोईवर पदर, खांद्यावर शाल घेऊन गणपतीची मनोभावे पूजा व आरती करण्यात आली. मानाची महाआरती संपन्न झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ. शाबिरा मुलाणी यांचा सन्मान ग्रामपंचायतीच्या कर्तव्यदक्ष माजी सरपंच सौ. रेखाताई प्रतापराव सालगुडे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सौ. वंदना ज्ञानेश्वर रणवरे, सौ. शोभा जितेंद्र सालगुडे पाटील, सौ. रुकसाना हुसेन मुलाणी, श्री. हुसेन मकबुल मुलाणी यांच्यासह मंडळातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button