तरंगफळसाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. राम सातपुते

तरंगफळ (बारामती झटका)
सहकार महर्षी पासून चालू असलेली तरंगफळची विकासाची परंपरा अशीच पुढे नेऊन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरंगफळ गावाला विकास निधी कधीच कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आरोग्यदूत लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केले. ते तरंगफळ येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभावेळी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील होते. या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्याचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, युवा नेते दत्ता भैय्या मगर, बांधकाम विभागाचे गोविंद कर्णवर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी 24 कोटी रु. चा माळशिरस-पिलीव रोड, तरंगफळ-गोरडवाडी चार कोटी रु. रोड चे भूमिपूजन, आरो युनिटचे उद्घाटन, पुतळा शुभशोभीकरण, पंधराव्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचा उद्घाटन आणि भूमिपूजन संपन्न झाला.
याच कार्यक्रमात जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज, तरंगफळ यांचा तसेच आचार्य दादासाहेब दोंदे उत्कृष्ट शाळा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ यांना मिळाल्याबद्दल, तसेच शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी तरंगफळचा सुपुत्र नागनाथ संपत साळवे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सवात गोल्डन बॉय पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच केंद्रीय पोस्ट भरतीमध्ये ब्रांच पोस्टमास्टर म्हणून निवड झाल्याबद्दल, मयुरी गोरख जानकर व वैष्णवी गोरख जानकर या भगिनींचा, तसेच कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल यशराज दत्तात्रय सावंत यांचा सर्वांचा सत्कार आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व आमदार रामभाऊ सातपुते यांचे शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी सरपंच नारायण तात्या तरंगे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी प्रास्ताविकात बीजउत्पादक सहकारी संस्थेचे व्हा. चेअरमन सुजित तरंगे यांनी विविध विकास कामे मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त करून विविध विकासकामांची मागणी केली. यामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन योजनेसाठी निधी मिळावा, गावात असणारे पाझर तलाव यांचे रूपांतर साठवण तलावात करणे, गावात विविध ठिकाणी दहा सिमेंट बंधारे बांधणे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक याला निधी मिळणेबाबत, राजे उमाजी नाईक स्मारकास निधी मिळणे बाबत, सार्वजनिक शौचालय, व्यायाम शाळा, ड गटात असणाऱ्या घरकुलांसाठी मंजुरी मिळणेबाबत, तीर्थक्षेत्र ब गटात तरंगफळ देवस्थान असल्यामुळे मिळणारा पाच कोटी निधी लवकरात लवकर गावासाठी मिळावा, त्या निधीतून पूर्ण गावाचा विकास होण्यासाठी नियोजन करावे. यासह होलार समाजासाठी गायरान मधून पाच एकर जागा मिळावी, अशा विविधकामांची मागणी करून येणाऱ्या काळात तरंगफळ मधील ग्रामस्थ मोहिते पाटील परिवाराच्या व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असे सांगितले.
यावेळी सरपंच सौ. पद्मिनी नारायण तरंगे, नारायण तात्या तरंगे, ॲड. शांतीलाल तरंगे, ग्रामसेवक संतोष पानसरे, उपसरपंच पांडुरंग कांबळे, जयंतीलाल तरंगे, महादेव तरंगे, मधुकर तरंगे, भागवत तरंगे, संजय देशमुख, सतीश कांबळे, शशिकांत साळवे, जगुबाई जानकर, राधाबाई तरंगे, तलाठी रुकसार तांबोळी मॅडम, भानुदास तरंगे, ज्ञानदेव जानकर, नारायण कर्चे, महाको जानकर, मानआप्पा तरंगे, संभाजी तोरणे, बापू पाटील, अविनाश मोहिते, संजय कोडलकर, प्रा. सुहास तरंगे, शिवरत्न कन्स्ट्रक्शनचे किरण तरंगे, अक्षय तरंगे, डॉ. महादेव वाघमोडे, गोविंद कांबळे, संजय वाघमोडे, युवराज नरोटे, दादासो काळे, आदींसह ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..