शिवशंकर बझारच्या संचालक पदी महाळुंग गावचे ज्येष्ठ नेते अनिलदादा मुंडफणे यांची निवड..
शिवशंकर बझारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी नूतन संचालक अनिलदादा मुंडफणे यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
अकलूज (बारामती झटका)
ग्राहकांना एकाच ठिकाणी स्वच्छ व निवडक किराणा बाजार व इतर संसार उपयोगी लागणारे सर्व धान्य व साहित्य मिळणारे माळशिरस तालुक्यातील एकमेव बझार अकलूज येथील उद्योग महर्षी स्वर्गीय उदयसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या शिवशंकर बझार च्या नूतन संचालक पदी महाळुंग-श्रीपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व पंचक्रोशीतील ज्येष्ठ नेते अनिलदादा रामचंद्र मुंडफणे यांची निवड करण्यात आली. त्याप्रसंगी शिवशंकर बझार च्या चेअरमन स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहीते पाटील व अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच व शिवरत्न उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य अनिलदादा जाधव, व्हा. चेअरमन मदन भगत, माजी चेअरमन अर्जुन भगत, भाजपा जिल्हा चिटणीस संदीपमामा घाडगे, माजी ग्रामपंचायत सदस्य अजित पोखरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, संचालक फुले साहेब, सिनप्पा वाघमोडे, हमीद वसान, नंदू सोनवणे शेठ, दादा पवार, जावेद पठाण, शिवशंकर बझार चे व्यवस्थापक माने देशमुख साहेब आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..
Very informative and funny! For those curious to know more, check out: FIND OUT MORE. Let’s discuss!