तासगाव याठिकाणी झालेल्या नॅशनल ॲबॅकस स्पर्धेमध्ये सुपर बेन ॲकॅडमीचे घवघवीत यश

माळशिरस (बारामती झटका)
तासगाव या ठिकाणी रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी नॅशनल ॲबॅकस स्पर्धा झाली. याठिकाणी राज्यातून १५९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये सुपर ब्रेन ॲकॅडमीचे एकूण १७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सुपर ब्रेन ॲकॅडमी शाखा अकलूज येथील ५ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. त्यामध्ये ईशान फडे, मित होरा, आरोही देवकाते, ऋत्विका देशमुख, सरस दोशी. तसेच शाखा माळशिरस यामधील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ७ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. त्यामध्ये श्वेता कोळेकर, जानवी माने, विश्वतेज वाघमोडे, वरद घनवट, प्रतीक घनवट, इरमनुरी शेख, जयेश कुंभार.


तसेच ५ विद्यार्थ्यांनी रँक मिळवला. त्यामध्ये ईशान सिद, नवीन कुळम, भाग्येश बंडगर यांना ४ रँक मिळाला. तर सानवी वाघमोडे हिने दुसरा रँक मिळवला. जयदीप माने या पहिलीतील विद्यार्थ्यांने चॅम्पियनशिप मिळवली. तसेच यावेळी सुपर ब्रेन ॲकॅडमीच्या शिक्षिका प्रा. संजीवनी वाघमोडे मॅडम यांना बेस्ट ॲबॅकस टीचर हा पुरस्कार मिळाला. सुपर ब्रेन ॲकॅडमीच्या अध्यक्षांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.