ताज्या बातम्याराजकारण

महायुतीच्या “महाविजय २०२४” साठी महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेनेला भाजपाकडून मान्यता

मुंबई (बारामती झटका)

लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी ॲड. श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे. महायुतीतील घटकपक्ष म्हणून सहभाग नोंदविण्यात आला आहे.

ॲड श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय स्वराज्य सेना (मराठा राजकीय पक्ष) रजि. नं.56/284/2018-19/PPS-i New DELHI ) हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील राजकारणात काम करत असून मराठा समाजासह शेतकरी व कष्टकरी या घटकांच्या प्रश्नावर कार्य करत असून महायुतीचा ‘महाविजय २०२४’ साकार करण्यासाठी सारे एकत्रित काम करून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत आहे. यासाठी एकत्र येवून ‘महाविजय २०२४’ साठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय स्वराज्य सेना ही कामाला लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, आमदार प्रतोद/ समन्वयक पक्ष व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दौरे सुरु करुण कामालाही लागले आहेत. प्रत्येक जिल्हानिहाय मेळावे घेण्यासही सुरुवात करत आहेत.

महायुती सरकारने कोणत्याही समाजावर अन्याय न करता कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले, त्याबद्दल महायुती सरकारचे पुनश्च धन्यवाद व आभार. समाजातील काही घटकांना काही कुणबी नोंदी शोधण्यास किंवा दाखले भेटण्यास काही अडचणी असेल तर त्यांनी तेथील जिल्हा अध्यक्ष किंवा थेट संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांनी केले आहे.

ॲड. श्रीहरी बागल
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय स्वराज्य सेना (मराठा राजकिय पक्ष) ELACATION COMMISSION OF INDIA REG NO – 56/284/2018-19 /PPS-i (New DELHI)
भाजपा – महायुती चा मराठा घटक पक्ष. संपर्क -९८२०३०५९०९.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort