अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी राजाभाऊ लक्ष्मण पिसे सेवानिवृत्त झाले.
माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी पिसे दांपत्यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मानित केले…
माळशिरस ( बारामती झटका )
अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी श्री राजाभाऊ लक्ष्मण पिसे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा सेवापुर्ती सन्मान माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी अखंड भागवत धर्माचे दैवत असणारे श्री विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा श्री राजाभाऊ लक्ष्मण पिसे व सौ विमल राजाभाऊ पिसे या दाम्पत्यांना मसवड रोड येथील निवासस्थानी देण्यात आले यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील व घरातील सौ दीप्ती व श्री दौलतराव राजाभाऊ पिसे सौ प्राजक्ता व श्री धनंजय राजाभाऊ पिसे नातवंडे तेजस्वी शिवदीप प्रांजल व इतर मान्यवर उपस्थित होते.


सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबामध्ये राजाभाऊ पिसे यांचा जन्म झालेला आहे दहावीपर्यंत शिक्षण झालेले आहे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज या ठिकाणी मैल मजूर म्हणून नोकरीस सुरुवात केली प्रामाणिक पणा व अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केलेला असल्याने अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माळशिरस तालुक्यामधील एकही रस्ता असा नाही की राजाभाऊ पिसे यांनी देखरेखीचे काम केलेले आहे सध्या त्यांचे प्रमोशन रोड मिस्तरी म्हणून काम पाहत होते 30 एप्रिल 2023 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत.

राजाभाऊ पिसे यांना दोन मुले त्यापैकी दौलतराव एम ए बी एड करून नोकरी करीत आहेत तर धनंजय बीएससी होऊन व्यवसाय करीत आहेत दोघांचीही लग्न होऊन सुस्थितीत पिसे परिवार यांचा प्रपंच सुरू आहे 2010 साली पिताश्री लक्ष्मण पिसे यांचे निधन झालेले आहे सध्या मातोश्री श्रीमती सुभद्रा पिसे यांना प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या मुलाने प्रामाणिकपणे नोकरी करून यशस्वीपणे सेवानिवृत्त झालेले असल्याचा चेहऱ्यावर आनंद तरळत होता. माळशिरस तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर नातेवाईक मित्रपरिवार यांनी राजाभाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng