Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्राक्ष वाघमोडे पाटील यांना २ कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

माळशिरस तालुक्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा भांबुर्डीच्या रुद्राक्ष बाळासाहेब पाटील वाघमोडे यांनी रोवला.

मुंबई ( बारामती झटका )

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्राक्ष बाळासाहेब वाघमोडे पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. रुद्राक्ष पाटील भांबुर्डी गावचे प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी सध्या पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असणारे बाळासाहेब वाघमोडे पाटील यांचे चिरंजीव आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीचा प्रत्यय येत आहे. भांबुर्डी गावच्या पिता-पुत्रांनी माळशिरस तालुक्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्राक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला.

कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्राक्ष बाळासाहेब वाघमोडे पाटील यांनी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. त्याबद्द्ल आज बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रुद्राक्ष वाघमोडे पाटीलने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. २०२४ ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्राक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button
marsbahis hacklink market casibom