“सद्गुरुचे डेप्युटी जनरल मॅनेजर भगवान पाटील यांना मातृशोक”

पिलीव (बारामती झटका) (रघुनाथ देवकर यांजकडून)
पिलीव, ता. माळशिरस येथील माजी पंचायत समिती सदस्य व पिलीव विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन कै. बाबुराव पांडुरंग मदने पाटील यांच्या पत्नी व सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर भगवान बाबुराव पाटील यांच्या मातोश्री शहाबाई बाबुराव मदने पाटील यांचे वयाच्या ८५व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे, आप्तसकीय, पाहुणेरावळे त्याचप्रमाणे पिलीव व पिलीव पंचक्रोशीतील असंख्य व प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी अंत्यदर्शनासाठी बहु गर्दी केली. अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात जनसागर लोटला होता .
स्व. शहाबाई मदने पाटील या मनमिळावू स्वभावाच्या व धार्मिक वृत्तीच्या असल्याने त्यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा देत त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या पिलीव गावचे माजी सरपंच अमोल मदने पाटील यांच्या आजी होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, नातवंडे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



