कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

ग्रामीण भागातील महिलांची शेळीपालन करून आर्थिक उत्पन्न देणारी एक प्रकारे पतपेढी असते..

स्वतःची गुंठा जमीन नाही मात्र, खंडीभर शेळ्यांचे पालन करून आर्थिक स्तोत्र वाढविणाऱ्या महिलेची यशोगाथा..

सदाशिवनगर (बारामती झटका)

ग्रामीण भागातील महिला स्वतःची शेती असो अगर दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला असतील, महिलांची शेळी पालन करून आर्थिक उत्पन्न देणारी एक प्रकारे पतपेढीच असते. स्वतःची गुंठा जमीन नाही मात्र, खंडीभर शेळ्यांचे पालन करून आर्थिक स्तोत्र वाढविणाऱ्या सदाशिवनगर येथील श्रीमती रमाबाई किसन बनसोडे यांची यशोगाथा वेगळीच आहे.

सदाशिवनगर ता. माळशिरस येथे रमाबाई व किसन बनसोडे सर्व सामान्य कष्टाळू दाम्पत्य होते. जमीन नाही दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाडकष्ट करून कुटुंबाची उपजीविका केलेली होती. त्यांना मुलगा ऋषिकेश व एक मुलगी आहे. मुलीचे लग्न होऊन मुलीचा सासरी सुखी संसार सुरू आहे. प्रामाणिकपणे कष्ट करून रमाबाई व किसन यांचा सुखी संसार होता. किसन बनसोडे यांचा म्हशी पाळण्याचा व्यवसाय होता. दुग्ध व्यवसाय व म्हशीची खरेदी विक्री यामधून आर्थिक स्तोत्र सुरू होते. रमाबाई मोल मजुरी करणाऱ्या महिलांची मुकादमची भूमिका बजावत असत. शेतकरी व बागायतदार यांच्या शेतामध्ये कोणत्याही कामासाठी महिलांना शेतामध्ये एकत्रितपणे काम करण्याचा पुढाकार रमाबाई बनसोडे यांच्याकडे असत. महिलांना त्यांची हजेरी देऊन उर्वरित राहिलेल्या रकमेमधून महिलांना सणासुदीला नवीन साड्या देऊन आनंदाने सण साजरा करण्यात कायम सहकार्य होते. महिलांना अडचणीच्या काळात मदत व सहकार्य करण्याची भूमिका असते. रमाबाई यांना महिलांमध्ये मानाचे स्थान कायम दिले जाते. दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून रानातून गवताचा भारा डोक्यावर आणत असतात.

गेल्या दोन वर्षांमध्ये रमाबाई आणि किसन यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागावी अशा पद्धतीने किसन बनसोडे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. प्रपंचाचा गाडा रमाबाई यांच्यावर आलेला आहे. त्या घरामध्ये मातृत्व व पितृत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे. पतीच्या निधनानंतर रमाबाई यांनी शेळी पालन व्यवसाय सुरू केलेला आहे. दुसऱ्याच्या शेतामध्ये व शेती महामंडळाच्या पडीक जमिनीमध्ये शेळ्या चारण्याचे काम सुरू असते. नजीकच्या शेतामधील गवत आणून शेळ्या जगविण्याचे काम सुरू आहे. त्यांना मुलगा ऋषिकेश व सुनबाई सौ. शुभांगी बनसोडे यांची साथ मिळत आहे. सुनबाई सुद्धा शेतामधून गवत आणण्यासाठी मदत करीत असतात. शेळ्यांच्या मधून उत्पन्न चांगले मिळत असते.

खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांचे शेळी पालन म्हणजे आर्थिक उत्पन्न देणारी एक प्रकारे पतपेढीचे असते. ग्रामीण भागातील महिला कोंबड्या व शेळीपालन यामधून आपल्या प्रपंचाला हातभार लावत असतात. ग्रामीण भागात दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाणाऱ्या महिलेच्या घरी एक तरी शेळी असते. दिवसेंदिवस खवय्यांची संख्या वाढत असल्याने कधी कधी एका शेळीला तीन ते चार पिल्ले होत असतात. त्यामध्ये जर तीन नर जातीची पिल्ले असतील तर त्याची किंमत चांगली येते. त्यामुळे शेळी पालनातून कुटुंबाची आर्थिक उत्पन्न देणारी एक प्रकारे पतपेढीच असते. श्रीमती रमाबाई बनसोडे यांचा समाजातील महिलांना आदर्श घ्यावा, अशा प्रकारचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort