Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा माळशिरस तालुक्यातील भाजपच्यावतीने सन्मान संपन्न.

माळशिरस तालुक्यातील पक्ष बांधणीसाठी लवकरच दौरा करणार – जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी.

अक्कलकोट ( बारामती झटका )

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा अक्कलकोट येथील निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा प्रभारी के.के. पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नारनवर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, उंबरे दहिगावाचे ज्येष्ठ नेते सदाशिव नारनवर, निमगावचे युवा नेते मिनीनाथ मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

मावळते जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर वरिष्ठांनी दिलेली आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबरोबर नगरपरिषदाच्या निवडणुका होणार आहेत. सोलापूर जिल्ह्याचा लवकरच दौरा कल्याणशेट्टी करणार असून माळशिरस तालुक्यातील पक्ष बांधणीसाठी लवकरच दौरा करून पदाधिकारी यांची बैठक घेणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

  1. Hey there! Do you know if they make any plugins to help with
    SEO? I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good results.
    If you know of any please share. Thanks! You can read similar article here:
    Link Building

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort