ताज्या बातम्याराजकारण

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची मनसे माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट…

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस तालुका संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष आजिनाथ वळकुंदे, नगरसेवक विजय देशमुख, नगरसेवक उद्योजक सचिन वावरे, नगरसेवक कैलास वामन, नगरसेवक महादेव कोळेकर, नगरसेवक रणजीत ओव्हाळ, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीपभैया पाटील, माळशिरसचे पोलीस पाटील शीतल पाटील, मनसे तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, जेष्ठ नेते निवृत्ती टेळे, भाजपचे शहर उपाध्यक्ष राजाभाऊ वळकुंदे, रशीद शेख, भाजपचे तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, दशरथ थोरात, सनी गुरव, अनिकेत काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा सन्मान ज्येष्ठ नेते निवृत्ती टेळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे मतदार संघात काम करीत असताना सर्व समावेशक काम करण्याचे सुरू आहे. कार्यातून तालुक्यामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून अनेक पक्ष व सामाजिक संघटना यांच्याशी व्यक्तिगत, राजकीय सलोखा निर्माण केलेला आहे. सुरेशभाऊ टेळे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गुणगौरव आमदार राम सातपुते यांनी केलेला होता. सुरेशभाऊ टेळे यांनी आमदार राम सातपुते यांच्याशी मैत्री वाढवलेली आहे. राज्यातील राजकारण काहीही असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार कार्यावर समाधानी आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort