Uncategorized

माळखांबी येथे राष्ट्रसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी.

माळखांबी (बारामती झटका)

राष्ट्रसंत जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी काही दिवसाचा अवधी राहिला असुन माळखांबी ग्रामपंचायतीने विद्यमान उपसरपंच प्रभाकर गमे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य व शौचालयासह येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोयी सुविधांची मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केली आहे.

राष्ट्रसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा दि. 25 जुन रोजी बोरगाव मुक्कामी आहे. त्यादिवशी अनेक दिंड्यासह 50 ते 60 टक्के वारकरी माळखांबी येथे मुक्कामी असतात. याची गैरसोय होऊ नये म्हणुन ग्रामपंचायतीने खबरदारी घेतली आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार दि. 26 जुन 2023 रोजी पालखी सोहळा माळखांबी गावामध्ये येणार आहे. अनेक वारकऱ्यांसह गावातील नागरिक दर्शनासाठी गर्दी करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा तयार केल्या आहेत. सदर पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी सरपंच सौ. मंगल पुजारी, उपसरपंच प्रभाकर गमे पाटील, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी आदी परिक्षम घेत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort