अकलूज येथे विरविजय चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन – श्रीराज माने पाटील

अकलूज (बारामती झटका) 

अकलूज ता. माळशिरस येथे श्रीराज भैय्या मित्र मंडळ यांच्यावतीने विरविजय चषक जिल्हावाईज एक दिवसीय डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रीराज माने पाटील यांनी सांगितले. यामध्ये राज्यस्तरीय संघांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या स्पर्धा अकलुज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये विजेत्या प्रथम संघास १ लाख रू. बक्षीस, द्वितीय ५१ हजार रु., तृतीय २१ हजार रू., चतुर्थ विजेत्या संघास २१ हजार रू. असे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ द मॅच, बेस्ट विकेटकीपर, बेस्ट बॉलर, विकेट हॅट्रिक, मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द सिरीज अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

सदर स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय महत्त्वाच्या संघांना आमंत्रित करण्यात आले असून स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धा रविवार दि. २५ डिसेंबर रोजी पार पडणार असून माळशिरस तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनने आयोजनासाठी सहकार्य केले आहे. आधिक माहितीसाठी कृष्णा पवार 7263828027, रोहीत देशमुख 7028190019, निनाद पवार 8788264832, अमीर भाई 9890579886, अक्षय बोडरे 8806850507 यांच्याशी संपर्क साधावा व सर्व क्रिकेट रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपिसेवाडीतील घर जळून संसार उघड्यावर आलेल्या पद्मिनी गाजाळे यांना उमेशशेठ भाकरे यांच्याकडून आर्थिक मदत.
Next articleमाळशिरस तालुक्यातील भाजपच्यावतीने पिसेवाडीचे नूतन ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार यांचा सन्मान संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here