अखिल भारतीय होलार समाज संघटनेची माळशिरस तालुका कार्यकारणीच्या निवडी जाहीर, तालुकाध्यक्षपदी दिनेश जावीर

माळशिरस ( बारामती झटका सुनिल ढोबळे यांजकडून)

शासकीय विश्रामगृह, माळशिरस येथे अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुक्याच्या नविन कार्यकारणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सदर तालुका कार्यकारणी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नंदकुमार केंगार साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभुषण ब्रह्मदेव केंगार महाराज होते व स्वागताध्यक्ष सांस्कृतिक विभागाचे प्रमुख लालासाहेब गेजगे हे होते.

तालुका कार्यकारणीची निवड जिल्हा उपाध्यक्ष सुनील ढोबळे व जिल्हा सदस्य हनुमंत बिरलींगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. सदर तालुका कार्यकारणीमध्ये दिनेश जावीर (तालुका अध्यक्ष), महादेव केंगार (तालुका कार्याध्यक्ष), विकास केंगार (तालुका सचिव), तुकाराम कांबळे (तालुका उपाध्यक्ष), सुरज हेगडे (तालुका उपाध्यक्ष), दादा करडे (तालुका उपाध्यक्ष), मोहन पारसे (तालुका संपर्क प्रमुख), नितीन गेजगे (प्रमुख संघटक), बापुदादा ढोबळे (तालुका संरक्षण प्रमुख), आनंद अहिवळे (तालुका संघटक), रणजीत नामदास (तालुका प्रसिद्धी प्रमुख), भागवत पारसे (सहसंपर्क प्रमुख), पांडुरंग नामदास (प्रमुख मार्गदर्शक), नामदेव केंगार (प्रमुख सल्लागार), विकास बिरलींगे (ता. सदस्य), राजेंद्र नामदास (ता. सदस्य), सुनिल गेजगे (ता. सदस्य), बुढा केंगार (ता. सदस्य) यांच्या निवडी करण्यात आल्या.

सदर कार्यक्रमास ज्येष्ठ मार्गदर्शक रंगाअण्णा गोरवे, कुंडलीक पारसे, हनुमंत ढोबळे, शिवाजी होनमाने, माजी तालुका अध्यक्ष गणेश केंगार, अण्णा गेजगे, गणेश नामदास, भारत नामदास, गणेश जाधव, अण्णा होनमाने, सुशिल करडे, बापुराव जावीर, विजय नामदास व सर्व होलार समाज बांधव उपस्थित होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचळवळीतील संघर्षयोद्धा आ. राम सातपुते यांनी चळवळीतील युवकांचा गुणगौरव केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या…
Next articleदत्त मंदिर ते न्यायालय रस्ता आठ दिवसांत दुरुस्त करू, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here