ताज्या बातम्याशैक्षणिक

श्री. संदीप सदानंद कुंभार यांचा रत्नत्रय शैक्षणिक संकुलामध्ये विशेष सत्कार.

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस, येथील श्री संदीप सदानंद कुंभार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत तांत्रिक सल्लागार तथा सचिव केंद्रीय बाष्पक मंडळ नवी दिल्ली या पदी नियुक्ती झाल्याबद्दल रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे प्रमोदभैय्या दोशी मित्र मंडळ, रत्नत्रय परिवार व सदाशिवनगर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अनंतलाल दादा दोशी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

श्री. संदीप कुंभार यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इस्लामपूर व सदाशिवनगर येथे झाले तर, माध्यमिक शिक्षण कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय. सदाशिवनगर येथे झाले. पदवी व पदव्युत्तर शिक्षण कराड येथे झाले. ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता श्रेणीत आले होते.

सत्कार प्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन प्रमोदभैय्या दोशी यांनी त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले असल्याचे सांगितले. त्यांचा जीवन प्रवास हा सर्व पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांनी त्यांनी मिळालेल्या यशाबद्दल कौतुक करून पुढील कार्य करत राहून सदाशिवनगरचे नाव उज्वल करावे, अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.

सत्कारास उत्तर देताना कुंभार साहेब म्हणाले की, माझ्या सर्व यशाचे श्रेय माझे आई, वडील, कुटुंब तसेच माझा मित्र परिवार यांना आहे. त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर हमखास यश मिळते असे यशाचे गमक सांगितले. सदर प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, सदानंद कुंभार, सदाशिवनगरचे सरपंच वीरकुमार भैय्या दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद भैय्या दोशी, सत्कारमूर्ती संदीप कुंभार, तुषार सानप, तनोज शहा, संतोष बनसोडे, शिवाजी खरात, सुभाष सुज्ञे, अमित पाटील सर, दैवत वाघमोडे सर आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort