आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मुंबई (बारामती झटका)

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आ. विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते ५२ वर्षांचे होते. एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.

मुंबईच्या दिशेने येताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यात ही दुर्घटना घडली. सकाळी पाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातात मेटे यांना हात, पाय आणि डोक्याला मार लागला होता. अपघातानंतर जवळपास तासभर मदत मिळाली नाही. खूप वेळ फोन करूनही पोलीस वेळेवर पोहोचले नाहीत, अशी माहिती मेटे यांच्या सहकार्यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार दरेकर हे रुग्णालयात मेटे यांची भेट घेण्यासाठी पोहोचणार आहेत, अशी माहिती येत आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्री पत्रकाराची संवाद साधणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदेव आहे का नाही माहित नाही, मात्र माणसातील देव माणूस पाहायला मिळाला – श्रीमती शोभाताई खोले.
Next articleसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने मोफत झेंडे वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here