Home इतर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या समवेत पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी...

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या समवेत पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाची हवाई पाहणी केली…

माळशिरस (बारामती झटका)

संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गाची पाहणी कर्तव्यदक्ष पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासोबत केली यावेळी त्यांच्यासोबत अनेक अधिकारीही उपस्थित होते.

पुणे, सासवड, जेजुरी, फलटण, माळशिरस अशी हवाई पाहणी करण्यात आली‌ तसेच नवीन पुणे-बेंगळूरू रस्त्याचीही यावेळी माहिती घेण्यात आली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५) हा २३३ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे)-सासवड-जेजुरी-निरा-लोणंद-फलटण-नातेपुते-माळशिरस-बोंडले-वाखरी-पंढरपूर असा आहे. या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सध्या रस्त्याचे वेगाने काम सुरू आहे. सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदी बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल.

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मधात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here