आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून अकलूज नगरपरिषदेसाठी 4 कोटी 92 लाखांचा निधी मंजूर, रस्ते गटारचे प्रश्न लागणार मार्गी

अकलूज (बारामती झटका)

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून अकलूज नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी सुमारे 4 कोटी 92 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या माध्यमातून रस्ते व गटारीची कामे मार्गी लागणार आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) या योजनेतून 3 कोटी 63 लाख 70 हजार तर नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून 1 कोटी 29 लाख 11 हजार रुपये असे एकूण 4 कोटी 92 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे पत्र नगरपरिषद कार्यालयास प्राप्त झाले आहे.

यामध्ये आप्पा शेटे घर ते बायपास रोड, व माहेर हॉस्पिटल ते बायपास रोड, व धनेश गांधी ते विकास खटावकर औदुंबर नगर येथे रस्ता डांबरीकरण करणेसाठी 80,24,776 रूपये, संत नरहरी नगर पाणी टाकी येथे रस्ता डांबरीकरण करणेसाठी 53,91,903 रूपये, सयाजीराजे पॅलेस ते वितराग हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण करणेसाठी 9,85,285 रूपये, अकलाई देवी देवस्थान ते भक्तनिवास पर्यंत बंधिस्त काँक्रीट गटार बांधकाम करणेसाठी 21,63,211 रूपये, विश्वनाथ खाडे घर ते कुमार नवगण ते पांडुरंग काळे घर व धनाजी भोसले घर ते ताजुद्दीन नाईकवाडी व किराणा भुसार दुकान ते नजीर शेख घर रस्ता डांबरीकरण व गटार करणेसाठी 35,86,267 रूपये, उत्तम पोटे घर ते विठ्ठल कोकणे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण आणि क्राँक्रीट गटार बांधकाम करणेसाठी 18,75,961 रूपये, जिजामाता कन्या प्रशाला ते अनिल जाधव एस.टी.डी. गटार बांधकाम करणेसाठी 27,03,925 रूपये, सदाशिव चव्हाण सर ते प्रशांत आवताडे घर रस्ता डांबरीकरण आणि क्राँक्रीट गटार बांधकाम करणेसाठी 22,47,923 रूपये, अकलूज सांगोला रोड ते शशिकांत हजारे घर व मोहिनी खुडे ते शफी तांबोळी व जयाबाई कोळी ते हणमंत खंडागळे व जयाबाई कोळी ते अमोल ताटे व शामराव बनसोडे ते उमेश भोसले घर विद्यानगर रस्ता डांबरीकरण करणेसाठी 28,45,022 रूपये, रमेश विरकर ते बाळासोा. पाटील घर टॉवर वसाहत रस्ता डांबरीकरण करणेसाठी 13,65,481 रूपये, राऊत मंगल कार्यालय ते पवार वस्ती गटार करणेसाठी 21,99,013 रूपये, इनामदार सर ते टेके घर व्हेज ट्रिट गटार बांधकाम करणेसाठी 24,82,809 रूपये, शिवकृपा कॉलनी ते दत्ता पवार वस्ती गटार बांधकाम करणेसाठी 4,99,882 असे एकूण 3,63,70,458 रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून नीरामाई नगर अंतर्गत रस्ता डांबरीकरणासाठी 44,67,620 रूपये, रामायण चौक ते अकलूज टेंभुर्णी रस्ता डांबरीकरण व गटार करणेसाठी 40,88,231 रूपये, पंचवटी येथील तय्यब मुलाणी ते माळीनगर रोडपर्यंत रस्ता डांबरीकरण व गटार बांधकामासाठी 29,49,643 रूपये व जुना सराटी रोड ते इराणी मस्जिद रस्ता व गटार करणेसाठी 14,05,760 असे 1,29,11,254 रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleफळवणी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…
Next articleउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस स्व‌. बकुळाबाई सुळ पाटील यांच्या परिवारांच्या दुःखात सहभागी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here