तरंगफळ येथील विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे लोकनियुक्त थेट जनतेतून सरपंच ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे यांचे आवाहन
तरंगफळ ( बारामती झटका )
विधान परिषदेचे कार्यसम्राट आ. रणजितसिंह मोहिते पाटील व माळशिरस विधान सभेचे लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शनिवार दि. 23/04/2022 रोजी सकाळी 9 वा. विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ धुमधडाक्यात होणार आहे. तरी तरंगफळ येथील विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच ज्ञानदेव उर्फ माऊली शंकर कांबळे यांनी केले आहे.
यावेळी उपसरपंच सुलोचना शिवाजी वाघमोडे, ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

तरंगफळ गावच्या हद्दीमध्ये विविध विकासकामांचा उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यामध्ये आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या फंडातून रेणुका माता मंदिरासमोर सभामंडप बांधणे, आ. राम सातपुते यांच्या फंडातून मायाक्का देवी मंदिरासमोर सभा मंडप बांधणे, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत तरंगफळ येथील तलाव क्रमांक 1, पाझर तलाव क्रमांक 2, व पठाण खोरा पाझर तलाव दुरुस्ती करणे, जिल्हा परिषद शाळा गावठाण, वाघमोडे वस्ती दुरुस्ती करणे, गावठाण शाळा येथे शौचालय बांधणे, सर्व अंगणवाड्यांना गॅस पुरवणे, 15 वा वित्त आयोगातून गावठाण ते कॅनल रस्ता तयार करणे, गावात सार्वजनिक ठिकाणी सिमेंट बाकडे बसवणे, आरोग्य उपकेंद्रासमोर पेविंग ब्लॉक बसवणे, वॉल कंपाऊंड, समोर पत्राशेड, दलित वस्ती सुधार योजनेतून आरओ प्लांट बसवणे, सार्वजनिक पाणी पुरवठा दुरुस्ती व आवश्यक साहित्य खरेदी अशा अनेक विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळ्यांचा धूमधडाका आहे. तरी तरंगफळ ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच ज्ञानदेव उर्फ माऊली कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
