भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर व मावळते चेअरमन शिवाजी आण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर.
माळशिरस ( बारामती झटका )
उंबरे दहिगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था उंबरे दहिगाव या सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या बिनविरोध निवडी भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर व मावळते माजी चेअरमन शिवाजी आण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करण्यात आलेल्या आहे.
यावेळी माजी चेअरमन ज्ञानदेव ठोंबरे, माजी उपसरपंच निवृत्ती ठोंबरे, ज्येष्ठ नेते सदाशिव नारनवर, माजी चेअरमन बाळू ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य संजय अनंता ढेकळे, अमोल नारनवर, अनिल पाटील, प्रकाश वाघमोडे, महादेव ठोंबरे, महादेव समिंदर, श्यामराव नारनवर, तानाजी वाघमोडे, वाघमोडे, निवृत्ती ठोंबरे, शहाजी भाऊ सरगर, बाळासो ढेकळे, शिवाजी ठोंबरे, भीमराव ठोंबरे, लखन नारनवर, रामचंद्र एकनाथ नारनवर, बाळू बोडरे, ज्ञानदेव तरंगे टेलर, अमोल सोपान नारनवर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक ठोंबरे शंकर शिवा, ठोंबरे तानाजी बापू, ठोंबरे विजय मोहन, वाघमोडे शिवाजी अण्णा, ठोंबरे भगवान नामदेव, नारनवर शहाजी महादेव, मकर भिमराव नामदेव, मोरे पोपट महादेव, सौ. नारनवर छायादेवी सोपानराव, सौ. नारनवर ताराबाई सदाशिव, गोरे बाळू लक्ष्मण, वाघमोडे राजाराम शंकर अशा 13 सदस्यांची ग्रामपंचायत उंबरे दहिगाव येथे चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीची सभा संपन्न झाली.
उंबरे दहिगाव गावातील भामाबाई दादासो सोनलकर यांचे दुःखद निधन झालेले होते. निवडीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी भामाबाई सोनलकर यांना उपस्थितांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सभेच्या कामकाजास सुरुवात केलेली होती. चेअरमन पदासाठी विजय मोहन ठोंबरे व व्हाईस चेअरमन पदासाठी ताराबाई सदाशिव नारनवर यांचे एकमेव अर्ज आलेले असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. राऊत यांनी बिनविरोध चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडी जाहीर केल्या संस्थेचे सचिव अनिल चव्हाण यांनी प्रक्रिया पार पाडण्याकरिता मदत केली.
उंबरे दहिगाव विकास सेवा सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर व शिवाजी आण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ सदस्य निवडून आलेले होते. विद्यमान सरपंच विष्णुपंत नारनवर गटाचे पाच सदस्य निवडून आलेले होते. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीवेळी सर्व सदस्य उपस्थित होते. चेअरमन पदी विजय ठोंबरे व व्हाईस चेअरमन पदी ताराबाई नारनवर यांच्या बिनविरोध निवडी होऊन सुद्धा गावामध्ये दुःखद घटना घडलेली असल्याने गुलालाची उधळण व आनंद उत्सव साजरा केलेला नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng